नवी दिल्ली 19 मार्च : मगरींची गणना जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये केली जाते. सिंह जसा 'जंगलाचा राजा' असतो, त्याचप्रमाणे मगरीलाही 'पाण्याचा राक्षस' म्हणतात. सिंहांमध्येही पाण्याखाली मगरीशी स्पर्धा करण्याची ताकद नसते. पाण्याच्या आत मगर आणि सिंह यांची चकमक झाली, तर मगरीच जास्त वरचढ ठरतील हे उघड आहे. तुम्ही मगरींना वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची शिकार करताना पाहिलं असेल. यासंबंधीचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावरही व्हायरल होतात. सध्या मगरीने केलेल्या शिकारीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. मात्र हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही नक्कीच अवाक व्हाल.
बिबट्याला पाहून सिंहिणीची सटकली, रागाच्या भरात केलं असं काही....Video व्हायरल
एका मगरीने एका हरणाची शिकार केली होती, परंतु हरिण गर्भवती असल्याचं समजताच मगरीने हरणाला लगेच सोडून दिलं आणि कोणतीही इजा न करता निघून गेली. जंगलातही काही नियम असतात, कदाचित मगरीनेही तोच नियम पाळून गर्भवती हरिणीचा जीव वाचवला असावा. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मगरीने एका मादी हरिणीला आपल्या जबड्यात पकडलं आहे. तिची पकड एवढी मजबूत आहे की हरीण हलूही शकत नाही. मात्र, काही सेकंदांनंतर मगर तिथून निघून जाते, त्यानंतर हरिण पळून जातं आणि मगरही पाण्याच्या दिशेने जाते. हरिण गर्भवती होतं, त्यामुळे मगरीने हरणाला सोडून दिल्याचं सांगण्यात येत आहे.
अद्भुत प्रकृति
मगर को जैसे ही पता चला कि हिरण प्रेग्नेंट है, मगर ने उस हिरण को तुरंत छोड़ दिया। ध्यान रहे…जंगली जानवर कभी स्वाद के लिए किसी को मारकर नहीं खाते, वो भूख मिटाने के लिए खाते है। प्रकृति के इस नियम का एक ही अपवाद है और वो है मनुष्य। pic.twitter.com/NzIwjaZm4O — हम लोग We The People (@ajaychauhan41) March 17, 2023
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @ajaychauhan41 नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'अद्भुत निसर्ग. हरीण गरोदर असल्याचं मगरीला समजताच मगरीने तत्काळ हरणाला सोडलं. लक्षात ठेवा…वन्य प्राणी चवीसाठी कधीच कुणाला मारत नाहीत, ते त्यांची भूक भागवण्यासाठी खातात. निसर्गाच्या या नियमाला एकच अपवाद आहे आणि तो म्हणजे माणूस.'
अवघ्या 34 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 14 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे 'अद्भुत! अविश्वसनीय' तर कोणी म्हणत आहे की 'या गोष्टी माणसालाही समजायला हव्या होत्या'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.