नवी दिल्ली, 19 मार्च : जंगलातील सर्वात भयानक आणि धोकादायक प्राण्यांच्या हल्ल्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच व्हायरल होत असलेलेल पहायला मिळतात. अंगावर काटा आणणारे अनेक शिकारीचे व्हिडीओ इंटरनेटवर फिरत असतात. कोण कधी अचानक कोणावर हल्ला करेल याचा काही नेम नसतो. अशातच सिंहिण आणि बिबट्याचा हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बिबट्या जंगलातील रस्त्यावर आरामात चालताना दिसत आहे. तो बराच वेळ एकटाच भटकतो. मात्र त्या भागातील राणीच्या नजरेस पडताच तिने वेळ न दवडता बिबट्यावर हल्ला केला. वास्तविक ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर होता तोच सिंहीणाचा परिसर होता. जिथे त्यांच्या इच्छेशिवाय कोणीही येऊ शकत नाही. मात्र बिबट्याने जंगलाच्या नियमाविरुद्ध जाऊन सिंहीणीच्या हद्दीत प्रवेश केला होता. म्हणूनच सिंहिणीने त्याला असा धडा शिकवला की तुम्हीही थक्क व्हाल.
हा दुर्मिळ व्हिडिओ Kayla du Toit नावाच्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. आणि जीवनातील सर्वोत्तम आणि रोमांचक क्षणांपैकी एक प्रसंग असल्याचं वर्णन केलं. सिंहीणीच्या धमक्यासमोर बिबट्याने हार पत्करली तेव्हा तो राणीच्या हद्दीतून पळून जाताना दिसला. Youtube चॅनल LatestSightings.com वर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, जंगलातील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. त्यांच्या थराराक व्हिडीओंना नेहमीच नेटकऱ्यांची पसंती असते. आत्तापर्यंत असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. लोकांना वन्य जीवन, प्राणी, यांमध्ये जास्त रस असल्यामुळे ते असे व्हिडीओ वारंवार पाहतात.