मुंबई, 22 मार्च : मगरी चे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. अगदी सिंह, वाघ, बिबट्या अशा शक्तिशाली प्राण्यांचंही मगरीसमोर काही चालत नाही. हे प्राणी सुद्धा मगरीला घाबरतात. अशा खतरनाक मगरीशी साध्या श्वानांनी पंगा घेतला आहे. पण इतर प्राण्यांना जे जमलं नाही ते या श्वानां नी केलं आहे. साध्या श्वानांनी खतरनाक मगरीचीही त्यांनी वाट लावली आहे. मगर आणि श्वानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. श्वान मगरीच्या समोर होता पण तरी मगरीने त्याची शिकार केली नाही. शिकार दूरच उलट मगरच श्वानाला घाबरून धूम ठोकून पळाली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना यावर विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, मगर पाण्याबाहेर जमिनीवर येत आराम करत होती. त्याचवेळी तिथं एक श्वान पोहोचला. पॉवर ऑफ ‘आईची चप्पल’! शिकारीसाठी आलेली खतरनाक मगरही धूम ठोकून पळाली; पाहा VIDEO आता एरवी इतर प्राणी मगरीला पाहताच तिच्यापासून दूर पळतात. पण श्वान मात्र अगदी बिनधास्त मगरीसमोर गेला. त्यानंतर तो तिच्यावर जोरजोरात भुंकू लागला. मगर थोडावेळ शांत होतीच. श्वान भुंकण्याचा कधी थांबतो याची वाट पाहत होती. मग श्वान काही शांत होईना. तो सतत भुंकत होता. शेवटी मगर वैतागली. श्वानाच्या भुंकण्याने ती घाबरली. त्यानंतर ती पाण्याच्या दिशेने जाऊ लागली. त्याचवेळी आणखी एक श्वान तिथं आला आणि दोघांनीही मगरीला सरो की पळो करून सोडलं. पाळीव श्वानांना घाबरून मगर पाण्यात पळून गेलं.
earth.reel इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. अमानुषपणाचा कळस! मुका जीव तडफडत होता, जीव जाईपर्यंत चौघांनी श्वानाला…; संतापजनक कृत्याचा VIDEO काही जणांनी या श्वानांच्या मालकांबाबत संतापत व्यक्त केला आहे, ज्यांनी या श्वानांना मगरीसमोर सोडून दिलं. तर काहींनी मगरीचं डोकं फिरलं असतं तर या श्वानांंचं काही खरं नव्हतं, अशी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी श्वानांच्या हिमतीला दाद दिली आहे.
तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.