मराठी बातम्या /बातम्या /Viral /हात धुण्यासाठी शेतकरी उतरला नदीच्या पाण्यात अन् मगरीने साधला डाव, पुढे झालं ते भयानक

हात धुण्यासाठी शेतकरी उतरला नदीच्या पाण्यात अन् मगरीने साधला डाव, पुढे झालं ते भयानक

राजस्थानमध्येमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगरिया गावातील चंबळ नदीत एका व्यक्तीला मगरीने खाल्याची घटना समोर आली आहे.

राजस्थानमध्येमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगरिया गावातील चंबळ नदीत एका व्यक्तीला मगरीने खाल्याची घटना समोर आली आहे.

राजस्थानमध्येमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगरिया गावातील चंबळ नदीत एका व्यक्तीला मगरीने खाल्याची घटना समोर आली आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Jaipur, India

धमेंद्र शर्मा (करौली), 26 मार्च : राजस्थानमध्येमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डांगरिया गावातील चंबळ नदीत एका व्यक्तीला मगरीने खाल्याची घटना समोर आली आहे. गुरे राखण्यासाठी गेलेल्या तरूण बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता. यावेळी त्याचे अवशेष सापडल्याने त्यावरून पुरावा शोधण्यात आला आहे. जनावरांना फिरवण्यासाठी गेलेला तरूण नदी किनारी जाताच मगरीने झडप घातल्याने तो गायब झाला होता. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू होता.

शोधकार्यात सिव्हिल डिफेन्सने स्थानिक पोलिस आणि ग्रामस्थांचेही सहकार्य घेतले आहे. दरम्यान त्याच्यासोबत असलेली जनावरेही गायब असल्याने त्यांचाही शोध सुरू होता. हा शोध सुरू असतानाच तरूणाच्या हाडांचा सापळा पोलिसांच्या हाती लागला आहे.  हा सापळा नागरी संरक्षण दलाने शोधून काढल्याचे बोलले जात आहे.

ह्रदयद्रावक! आजीच्या घरी सुट्टीला आली अन् नको ते घडलं, मुलीची प्रकृती चिंताजनक

दरम्यान चंबळ नदी काठावर सापडलेल्या अवशेषांचे तरूणांच्या कुटुंबियांनी अत्यसंस्कार केल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री रमेश मीना यांनी डांगरिया गावाला भेट देत  शोध मोहिमेची माहिती घेतली.

मंत्र्यांनी त्या तरूणाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलण्याबरोबरच चंबळमधील मगरीच्या त्रासापासून येथील जनतेला दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली.

डागरिया गावात असलेल्या चंबळ नदीच्या घाटावर मगरीने शुक्रवारी एका तरूणावर हल्ला केला. हल्ल्यानंतर मगरीने त्या गुराख्याला चंबळ नदीत ओढून नेत गिळल्याची माहिती आहे. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. शनिवारी सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू झाली.

धक्कादायक! मंदिराच्या दारातच रशियन मुलीसोबत नको ते कृत्य केलं अन्…

डांगरिया गावातील मानकू कोळी (वय 50) हा शेळ्या चरण्यासाठी जंगलात आला होता. या दरम्यान गुराख्याने आणलेले जेवण खायचे म्हणून हात धुण्यासाठी चंबळ नदीच्या काठावर गेला. चंबळच्या काठावर टक लावून बसलेल्या मगरीने त्याच्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर मगरीने प्राण्याला जबड्यात पकडून खोल पाण्यात नेले. यावेळी मेंढपाळाने काही वेळ आरडाओरडा केला पण त्याला मगरीपासून वाचवण्याची धडपड करता आली नाही. त्याचे अन्न व कपडे किनाऱ्यावर टाकून दिले.

First published:
top videos

    Tags: Local18, Rajsthan