संतोष कुमार गुप्ता (छपरा), 26 मार्च : बिहारमधील छपरा येथे एका तरुणाने 4 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान ही माहिती ग्रामस्थाना समजताच त्या नराधमास पकडून बेदम मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना बिहारच्या पारसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिशनपूर येथे घडली असल्याची देण्यात आली आहे. ज्या व्यक्तीवर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहे त्या व्यक्तीचे नाव बुधन राम असे आहे.
या तरुणाने 4 वर्षांच्या मुलीला तिच्या आजोबांच्या घरात कोण नसल्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत मुलीने आरडाओरडा करताच शेजारी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान त्या तरुणास पकडत बेदम मारहाण केली. यानंतर त्या नराधमास पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या घटनेबाबत पारसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरीसारखी सेमटू सेम दिसणारी 'ही' अभिनेत्री करणार होती ‘हम आपके हैं कौन’ सिनेमा
पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी छपरा सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान पिडीतेची प्राथमिक तपासणी करण्यात आली यावेळी वैद्यकीय अहवालानुसार तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीची वैद्यकीय तपासणी केली जात असून प्रथमदर्शनी बलात्काराचा आरोप खरा असल्याचे दिसत आहे.
मात्र, अहवाल आल्यानंतरच सविस्तर माहिती मिळेल असे सांगण्यात आले. दुसरीकडे, आरोपी बुधन रामने सांगितले की, मी अशाप्रकारचे कोणतेही कृत्य केले नसल्याचे सांगितले. परंतु तेथील लोकांनी मला पूर्ववैमनस्यातून पकडत मारहाण केली आहे. यानंतर पोलिसांना बोलावून मला ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी बुधन राम यास वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी त्याचीही वैद्यकीय तपासणी करण्याती आली.
दरम्यान पिडीता ही अमनौर या गावात राहणारी असून ती आजीच्या घरी सुट्टीला आली होती. याचा गैरफायदा घेत बुधन रामने तिला पकडून बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु त्या पिडीतेने आरडाओरडा करताच बुधन रामला पकडून बेदम मारहाण केली.
लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवल आयुष्य, हॉटलेमध्ये घेतला गळफास
या प्रकरणी पोलीस अधिकारी गौरव मंगला यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या अर्जावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.