ईशा बिरोरिया (ऋषिकेश), 26 मार्च : उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये एका परदेशी महिलेसोबत विनयभंगाची घटना समोर आली आहे. महिलेने विरोध केला असता आरोपीने तिच्यावर दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात महिला किरकोळ जखमी झाली आहे. पीडितेने बचावासाठी आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एकच गर्दी केली. यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता तुरूंगात पाठवण्यात आले आहे.
ह्रदयद्रावक! आजीच्या घरी सुट्टीला आली अन् नको ते घडलं, मुलीची प्रकृती चिंताजनक
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ऋषिकेशमधील भूतनाथ मंदिराजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाची एक महिला पर्यटक भूतनाथ मंदिराजवळून जात होती. यावेळी एका तरुणाने महिला पर्यटकाशी आधी बोलून मैत्री करण्याचा प्रयत्न केला.
मात्र महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पुढे निघून गेली. त्यानंतर तरुणाने तिचा रस्ता अडवत तिचा विनयभंग केला.म हिला पर्यटकाने विरोध केल्यावर त्याने तिच्यावर दगडफेक केली, यातून ती जखमी झाली.
महिलेचा आरडाओरडा ऐकून तेथे उपस्थित लोकांनी एकच गोंधळ घातला, त्यानंतर आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेला. पीडितेला लक्ष्मण झुला शासकीय अॅलोपॅथी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती महिलेने पोलिसांना दिली. त्यावर लक्ष्मण झुला पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद सिंह यांनी पोलीस पथकासह आरोपींच्या शोधात मोहीम राबवली.
लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवल आयुष्य, हॉटलेमध्ये घेतला गळफास
त्यानंतर पोलिसांनी जंगलातील झुडपात लपलेल्या आरोपीला अटक केली. पोलिस चौकशीत आरोपीने आपले नाव अनुज असल्याचे सांगितले. तो उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नकुड तहसीलमधील टिट्रो शहराचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चार दिवसांपूर्वी ऋषिकेशला भेटायला आला होता आणि परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Uttarakhand