Home /News /viral /

Shocking! कुत्रा-मांजरासारखं चक्क खतरनाक सिंहाला महिलेने आपल्या कुशीत घेतलं आणि...; CCTV कॅमेऱ्यात कैद झालं भयानक दृश्य

Shocking! कुत्रा-मांजरासारखं चक्क खतरनाक सिंहाला महिलेने आपल्या कुशीत घेतलं आणि...; CCTV कॅमेऱ्यात कैद झालं भयानक दृश्य

महिलेने रस्त्यावर चालताना चक्क सिंहाला आपल्या कुशीत उचलून घेतलं.

    कुवेत, 04 जानेवारी : अरब देशांमध्ये तर कुत्रे-मांजरांप्रमाणे हिंस्र प्राण्यांनाही पाळण्याची हौस आहे. असाच एक भयंकर प्रकार समोर आळा आहे. ज्यात एक महिला रात्री रस्त्यावर चक्क  का सिंहाला आपल्या कुशीत घेऊन फिरताना दिसली (Lion In Arms). सीसीटीव्हीमध्ये हे खतरनाक दृश्य कैद झालं आहे. कुवेतच्या रस्त्यावरील हे भयंकर दृश्य आहे (Kuwait Shocking Video). स्थानिक माहितीनुसार हा सिंह या महिलेचा पाळीव सिंह होता. हा सिंह रात्री घरातून पळाला होता. त्यानंतर सिंहाच्या मालकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पण सिंहाला शोधण्यासाठी रात्रीच सर्वजण बाहेर पडले. हे वाचा - OMG! हिंस्त्र चित्त्याला KISS करू लागली तरुणी; पाहा पुढे काय घडलं,Shocking Video पोलीस येण्याआधीच सिंहाच्या मालकीणीला तो सापडला. तिने आपल्या सिंहाला पकडलं आणि एखाद कुत्रं-मांजर कुशीत घ्यावं. तसं तिने सिंहाला कुशीत घेतलं. लोकल रिपोर्टनुसार ही तरुणी आणि तिचे वडील या सिंहाचे मालक आहे. त्यांनीच त्याला पकडून आपल्या घरी नेलं. ही पहिली घटना नाही आहे. याआधीसुद्धा कुवेतमध्ये अशीच एक घटना घडली होती. जिथं एका सिंहाला पोलिसांनी शोधून काढलं होतं आणि त्याला त्याच्या मालकाच्या स्वाधीन केलं होतं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Wild animal, World news

    पुढील बातम्या