मराठी बातम्या /बातम्या /Viral /बापरे! शार्कलासुद्धा मगरीनं सोडलं नाही; पाहता पाहता काही क्षणातच केलं गिळंकृत

बापरे! शार्कलासुद्धा मगरीनं सोडलं नाही; पाहता पाहता काही क्षणातच केलं गिळंकृत

समुद्रावरील शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

समुद्रावरील शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

समुद्रावरील शिकारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

कॅनबेरा, 13 फेब्रुवारी : मगर (crocodile) अगदी हुशारीनं आपला शिकार करते. वाघ, सिंह, बिबट्या अशा प्राण्यांनादेखील एकाच हल्ल्यात ती आपला शिकार बनवते. आता तर मगरीनं समुद्रात शार्कचीही (shark) शिकार केली आहे. शार्कलाही तिनं सोडलं नाही. अवघ्या काही क्षणांत शार्कला गिळंकृत करणाऱ्या मगरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मगर आणि शार्कचा हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील (Australia) असल्याचं सांगितलं जातं आहे. जिथं समुद्रकिनाऱ्यावर पाण्यातून एक भलीमोठी मगर बाहेर येते आणि किनाऱ्यावरल शार्कला आपला  शिकार बनवते.

एनडीटीव्हीनं NZ Herald चा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, युवोन्ना पालमेर नावाची व्यक्ती रविवारी सुदूर उत्तर क्वींसलँडच्या कॅसोवरी समुद्रकिनाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्या कॅमेऱ्यात तिनं हे दृश्य कैद केलं. ryan_moody_fishing च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हे वाचा - पाण्यात घुसूनच मगरीवर थेट अटॅक; शिकारीचा थरारक VIDEO

फेसबुक, इन्स्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता. समुद्रातून एक भलीमोठी मगर बाहेर येत. समुद्रकिनारी दोन शार्क बसलेले आहे. मगर त्यांच्या दिशेनं येते आणि एका शार्कला आपल्या जबड्यात घेते. शार्क मगरीच्या तोंडात तडफडतानाही दिसते. पण पाहता पाहता मगर त्या शार्कला गिळंकृत करते. व्हिडीओत एका शार्कला खाल्ल्यानंतर मगर पुन्हा दुसऱ्या शार्ककडेही वळताना दिसते. कदाचित तिनं या शार्कलाही खाल्लं असावं. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडीओ आहे. जो पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

हे वाचा - अक्ल बड़ी या भैंस? माणसांच्या प्रश्नांना अखेर म्हशीनंच दिलं उत्तर; पाहा हा VIDEO

पामरनं सांगितलं, तिनं या शार्कला पकडलं होतं. त्यांना ती पुन्हा पाण्यात सोडण्याच्या विचारात होती. पण तितक्यात समुद्रातून मगर आली आणि तिनं या शार्कला खाल्लं. त्यामुळे ती त्या शार्कला पाण्यात सोडू शकली नाही.

First published:
top videos

    Tags: Crocodile, Other animal, Shark death, Shocking viral video, Viral