मराठी बातम्या /बातम्या /Viral /

बापरे! डुलकीने नेलं मृत्यूच्या दारात; जाग येताच मगरीच्या जबड्यात होती महिला

बापरे! डुलकीने नेलं मृत्यूच्या दारात; जाग येताच मगरीच्या जबड्यात होती महिला

काही वेळात आपण मृत्यूच्या दारात पोहोचणार आहोत, याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता.

काही वेळात आपण मृत्यूच्या दारात पोहोचणार आहोत, याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता.

काही वेळात आपण मृत्यूच्या दारात पोहोचणार आहोत, याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 06 ऑक्टोबर : एक छोटीसी डुलकी. ज्याचे  परिणाम तसे बऱ्याच जणांनी अनुभवले आहेत. पण एका महिलेने मात्र भयंकर परिणाम अनुभवला आहे. एका डुलकीमुळे ही महिला चक्क मृत्यूच्या दारात पोहोचली आहे. महिलेचा अचानक डोळा लागला, झोप लागली. पण जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिनं स्वतःला मगरीच्या जबड्यात पाहिलं (Crocodile Attack on Woman).

फ्लोरिडातील ही धक्कादायक घटना. सेंट पीटर्सबर्गमध्ये राहणारी ही 50 वर्षांची महिला. घराजवळील तलावाजवळ सूर्यप्रकाश घेत अशीच पडली होती. आपण काही वेळात मृत्यूच्या दारात पोहोचणार आहोत, याचा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. अचानक तिला झोप लागली. झोपेत तिने आपली कुस बदलली आणि ती थेट तलावातच कोसळली. ज्या तलावात ती पडली तिथं भलीमोठी मगर होती.

हे वाचा - OMG! छोट्याशा खारीने भयंकर सापाला अक्षरशः कुरतडलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO

ती पाण्यातून बाहेर पडणार इतक्यात तिच्यावर मगरीने हल्ला केला. महिला मदतीसाठी ओरडत होती. तोपर्यंत मगरीने तिचे हातपाय आपल्या जबड्यात धरले. नंतर काही लोक तिच्या मदतीला धावून आले. कसंबसं करून सर्वांनी त्या मगरीच्या जबड्यातून त्या महिलेला खेचून बाहेर काढलं. तिला रुग्णालयात नेण्यात आलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना 4 ऑक्टोबरची असल्याचं सांगितलं जातं आहे.  यानंतर परिसरात दहशतीचं वातावरण आहे. महिला जिथं झोपली होती, तिथं बरेच लोक झोपायला येतात. त्यामुळे ही मगर आणखी कुणावर तरी हल्ला करण्याची शक्यता होती. त्यामुळे या घटनेनंतरच प्रशासन कामाला लागलं. या मगरीला रात्रीच पकडण्यात आलं. तब्बल 11 फूट लांबीची ही मगर होती.

हे वाचा - किंग कोब्राशी खेळणं शेतकऱ्याच्या जीवावर उठलं; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO!

याआधी एका तरुणाच्या अंथरुणात मगर घुसल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. tangothedwarfcaiman नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता.

टोगो असं या मगरीच्या पिल्लाचं नावं आहे. इन्स्टाग्राम युझरच्या म्हणण्यानुसार, मगरीचे पिल्लू दररोज पलंगावर येते आणि त्यांना KISS करून पुन्हा टाकीमध्ये जाते.  त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'मी या मगरीला नीट जवळ घेतल्याशिवाय मला झोप लागत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

First published:

Tags: Crocodile, Viral