• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • किंग कोब्राशी खेळणं शेतकऱ्याच्या जीवावर; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO!

किंग कोब्राशी खेळणं शेतकऱ्याच्या जीवावर; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO!

नसता प्रताप शेतकऱ्याच्या जीवावर उठला आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ लोकांनी शूट केला आहे.

 • Share this:
  आसाम, 6 ऑक्टोबर : निसर्गाशी कधी खेळ करू नये असं वडील धाऱ्यांकडून सांगितलं जातं. निसर्गातील जीव घटकांसोबत दाखवलेलं धाडस अंगाशी येऊ शकतं. असाच प्रकार दक्षिण आसाममधून समोर आला आहे. या घटनेचा एक धक्कादायक VIDEO (Shocking Video) समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक व्यक्ती किंग कोब्राला गळ्यात घेऊन उभा आहे. तो त्याला हाताळण्याचा प्रयत्न करीत आहे. किंग कोब्राचं वजन जास्त असतं. त्याला तो हातळणं कठीण जात आहे. मात्र नसतं धाडस दाखविण्याच्या नादात या व्यक्तीने स्वत:चा जीव गमावला (King Cobra bites Farmer) आहे. (Farmer dies while playing with King Cobra shocking VIDEO) हा व्हिडीओ दक्षिण आसाममधील (South Assam) बराक घाटीतील आहे. येथे शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याला एक भला मोठा किंग कोब्रा दिसला. शेतकऱ्याने हिमंत करीत त्याला भला मोठ्या किंग कोब्र्याला पकडलं. तो कोब्रा लोकांना दाखवित होता. हे ही वाचा-VIDEO - मेहुण्यांनी रस्ता अडवून दिला त्रास; वैतागलेला नवरदेव छतावरच चढला आणि... आणि स्वत:बद्दल सांगत होता. त्याने किंग कोब्राला कसं पकडलं, त्याला पकडणं किती अवघड होतं, याबद्दल बरचं काही तो लोकांना सांगत होते. त्यावेळी आजूबाजूचे लोक त्याचा व्हिडीओ शूट करीत असल्याचं दिसत आहे. दरम्यान सापाने 60 वर्षीय रघुनंदन भूमिज याला चावला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र किंग कोब्राच्या चाव्यानंतर तो जिवंत राहू शकला नाही. रुग्णालयातच भूमिज याचा मृत्यू झाला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: