रायचंद शिंदे, जुन्नर, 21 फेब्रुवारी : वअनेकांनी तर आपल्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतलेत. सध्या आणखी एक बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला असून या घटनेनं परिसरात खळबळ उडवली आहे.
सध्या बिबट्याच्या हल्ल्याची समोर आलेली घटना जुन्नरमधील आहे. जुन्नर परिसरात शिकारीच्या हेतुने बिबट्याचे हल्ले वाढत असताना नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालंय. असाच एक बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटिव्ही कँमेरात कैद झालाय. राजुरी येथील बंगल्याच्या पायरीवर मालकाची रखवलदारी करणा-या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करत गंभीर जखमी केले. दरम्यान बंगल्यातून घरमालक तातडीने बाहेर आल्यावर बिबट्यानं धुम ठोकली. हा बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटिव्ही कँमेरात कैद झालाय.
सावज तावडीत सापडलंच होतं पण असं काही घडलं की शिकार टाकून बिबट्यावर जीव वाचवण्याची वेळ आली#BIBTYA #VIRAL #CCTV pic.twitter.com/rwzwEozd6Q
— News18Lokmat (@News18lokmat) February 21, 2023
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतंय की, घरासमोर एक कुत्रा राखण करत बसलेला आहे. अचानक घराच्या दुसऱ्या बाजुने बिबट्या दबक्या पावलांमध्ये येत आहे. त्यानंतर तो अचानक येत घरासमोर बसलेल्या कुत्र्यावर हल्ला चढवतो. बिबट्याने हल्ला करताच कुत्र्याची माव पकडलेली दिसत आहे. तो कुत्र्याचा बळी घेणार तेवढ्यात घरातील लोक बाहेर येतात आणि बिबट्या तेथून धूम ठोकतो. बिबट्याच्या या भयानक हल्ल्यात कुत्रा मात्र गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान, जंगलातील प्राण्यांचं आता मानवी वत्तीकडे स्थलांतर पहायला मिळत आहे. ते अन्नाच्या शोधात बऱ्याच वेळा मानवी वस्तीकडे येतात आणि यातूनच हल्ल्यांचे प्रमाण वाढलं आहे. दुसरीकडे वाढते हल्ले पाहता नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण तयार झालंय. आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणांवरुन अशा प्राण्यांच्या हल्ल्यांची प्रकरणे समोर आली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv footage, Pune, Shocking, Viral, Viral news