नाशिक 12 जून : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्याचा वावर वाढलेला आहे. अनेकदा बिबट्या प्राण्यांवर तर कधी माणसांवरही हल्ला करत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशात आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आहे. यात बिबट्यानं एका पाळीव कुत्र्याला आपलं शिकार बनवलं (A Leopard Hunts Pet Dog) आहे. शिकारीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral on Social Media) होत आहे. OMG! हे डोले-शोले माणसाचे नाही तर प्राण्याचे; कोण आहे हा Bodybuilder animal पाहा व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की रात्रीच्या शांतेतत हा बिबट्या घराच्या अंगणात येतो. अंगणात एक पाळीव कुत्रा झोपलेला असल्याचं यात दिसतं. यानंतर बिबट्या लोखंडाच्या कुंपणावरुन घराच्या परिसरात प्रवेश करतो. यानंतर बिबट्या कुत्र्याच्या दिशेनं पुढे सरकरतो. कुत्र्याला याबाबत काहीही भनक लागलेली नसते. यानंतर कुत्र्याच्या एकदम जवळ जात हा बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो. बिबट्या एका क्षणात या कुत्र्याचा फडशा पाडतो.
#WATCH | Maharashtra: A leopard hunts a pet dog sleeping outside a house in Bhuse village of Nashik.
— ANI (@ANI) June 11, 2021
(Source: CCTV footage) pic.twitter.com/sHZ1O6VUEE
OMG! हे डोले-शोले माणसाचे नाही तर प्राण्याचे; कोण आहे हा Bodybuilder animal पाहा यानंतर बिबट्या कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून तिथून निघून जातो. व्हिडिओ नाशिकच्या भूसे गावातील एका घरासमोरील आहे. व्हिडिओमध्ये दिसतं, की हा बिबट्या कुत्र्याला हळूहळू झाडीकडे घेऊन जातो आणि नंतर गायब होतो. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 36 सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 23 हजारहून अधिकांनी पाहिलं आहे.