मराठी बातम्या /बातम्या /Viral /मासे पकडत होता चिमुकला; मगरीने जबड्यात धरला गळ आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

मासे पकडत होता चिमुकला; मगरीने जबड्यात धरला गळ आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

चिमुकला तलाव्याच्या किनाऱ्यावर जाताच मगर आली आणि...

चिमुकला तलाव्याच्या किनाऱ्यावर जाताच मगर आली आणि...

चिमुकला तलाव्याच्या किनाऱ्यावर जाताच मगर आली आणि...

  वॉशिंग्टन, 14 ऑक्टोबर : हिरवागार रमणीय परिसर, निळेशार पाणी, आल्हाददायक वातावरण असलेल्या एखाद्या सुंदर ठिकाणी वेळ घालवणं सगळ्यांनाच आवडतं; मात्र काही वेळा त्या ठिकाणाची नीट माहिती नसेल तर तिथं जाणं धोकादायक ठरू शकतं. याचाच अनुभव अमेरिकेतल्या (USA) एका कुटुंबाला आला. त्यांच्यासोबत घडलेल्या (Fishing video) या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे (Crocodile attack video).

  फ्लोरिडामध्ये अतिशय सुंदर ठिकाणी मासे पकडणाऱ्या एका चिमुकल्याजवळ एका मगरीने हल्ला केला आहे.  पाम कोस्ट (Palm Coast) इथं ही घटना घडली असून, त्याचा थरारक व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे. अवघ्या 48 सेकंदांची ही क्लिप बघणाऱ्याच्या जिवाचं पाणी पाणी करणारी आहे.

  या व्हिडिओत एक लहानसा मुलगा (Little Boy) एका तलावाकाठी उभा राहून मासेमारीच्या आपल्या छोट्याशा गळाने (Fishing Rod) मासे पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अचानक गळ जड लागू लागल्याने तो पाण्याच्या दिशेने पुढे पुढे जाताना दिसतो. मोठा मासा गळाला लागला वाटतं, या विचाराने तो उत्साहित झाल्याचं दिसत आहे.

  पाण्याच्या अगदी जवळ जात तो गळ खेचून बाहेर काढत असतानाच पाण्यातून वेगाने बाहेर आलेली एक भलीमोठी मगर त्या गळाला लागलेल्या माशावर झडप घालत असल्याचं दिसतं. ते बघताच तो छोटासा मुलगा घाबरून जोरात ओरडतो आणि गळ तिथेच टाकून मागे सरतो. मगर तो मासा आणि गळही घेऊन जात असल्याचं दिसतं.

  हे वाचा - स्वतःच्या हाताने भरवणाऱ्या महिलेलाच माशाने पाण्यात खेचलं आणि...; खतरनाक VIDEO

  हा व्हिडिओ सीन मॅकमोहन (Sean Mcmohan) यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत दिसणारा छोटा मुलगा हा त्यांचा मुलगा असून, त्याचं नाव डॉसन (Dawson)आहे. डॉसन मासेमारी करत असताना सीन त्याचं व्हिडिओ शूटिंग करत होते. लोकांना सावधगिरीची सूचना देण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. 'सावधान, इथे मगर आहे! डॉसननं एक मासा (Fish) पकडला; मात्र कशी कोण जाणे तिथे अचानक एक मगर (Alligator) आली आणि तिने मासा आणि मासेमारीचा गळही खेचून नेला,' असं त्यांनी या व्हिडिओ सोबतच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, असंख्य नेटिझन्सनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर भीतीनं थरकाप झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो छोटा मुलगा जास्त पुढे गेला असता तर... या नुसत्या विचारानेदेखील भीतीनं जिवाचं पाणी झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. सीन यांनी आपल्या इतक्या लहान मुलाला पाण्याच्या इतकं जवळ न्यायला नको होतं असं अनेकांनी म्हटलं आहे. 'फ्लोरिडामध्ये जिथं पाणी आहे तिथं मगरी आहेत. मासेमारी करताना खूप सावध राहा,' अशी सूचना एकाने केली आहे. 'या घटनेचा शेवट दुर्दैवीही होऊ शकला असता; मगरींना लहान प्राणी, कुत्री, मुलं आवडतात,' असं एका युझरने म्हटलं आहे. 'तुमचं मूल जिवंत राहणार की नाही हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे हे लक्षात घ्या आणि अधिक काळजीपूर्वक वागा,' अशी कानउघाडणीही नेटीझन्सनी केली आहे.

  हे वाचा - 5 वाघांच्या तावडीत सापडला कुत्रा; आधी जवळ आले अन् मग...., थरकाप उडवणारा VIDEO

  त्या मुलाचं नशीब बलवत्तर होतं म्हणून तो वाचला याची खात्री हा व्हिडिओ बघितल्यानंतर पटते. लहान मुलांना पाण्याजवळ नेताना किंवा जाण्याची परवानगी देताना पालकांनी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे, हे यातून स्पष्टपणे जाणवतं. पालकांसाठी हा मोठा धडा आहे.

  First published:

  Tags: Crocodile, Shocking viral video, Viral, Viral videos