Home /News /viral /

स्वतःच्या हाताने खाणं भरवायला गेली अन् भल्यामोठ्या माशाने तिलाच पाण्यात खेचलं आणि... धडकी भरवणारा VIDEO

स्वतःच्या हाताने खाणं भरवायला गेली अन् भल्यामोठ्या माशाने तिलाच पाण्यात खेचलं आणि... धडकी भरवणारा VIDEO

माशांना स्वतःच्या हाताने खाणं भरवणं महिलेला पडलं महागात.

    वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : आपण कुठे फिरायला गेलो की पर्यटनस्थळी असलेल्या पक्ष्यांना (Feeding birds), प्राण्यांना खायला (Feeding animals) घालायला आपल्याला खूप आवडतं. समुद्रातून प्रवास करत असताना आकाशात उंच उडणारे पक्षी आणि पाण्यातील मासे (Feeding fish video) यांना तर आपण हमखास खायला देतोच. पण मासे किंवा पक्षी यांना खायला घालताना आपणही सावध राहायला हवं, नाहीतर काय होऊ शकतं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. समुद्रात माशांना खायला घालणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. ज्या माशांना ती खायला घालत होती, त्यापैकीच एका भल्यामोठ्या माशाने तिला पाण्यात खेचून घेतलं. महिला बोटीतून पाण्यात पडली. धडकी भरवणारा हा असा व्हिडीओ आहे. पाहताच अक्षरशः काळजाचा ठोका चुकतो. व्हिडीओत पाहू शकता एक महिला पालथं राहून माशांना खायला घालण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्या हातात पाण्याच्या दिशेने तिने छोटे मासे धरून ठेवले आहेत. हे मासे ती माशांना खायला देत असते. पण तिथं काही पक्षी तिच्या हातातील मासे खायला येतात. ती पक्ष्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करते, पण पक्षी काही जात नाहीत. ते तिचा हातच आपल्या चोचीत धरून तिच्या हातातील मासे हिसकावून घेतात. महिलेला एका पक्ष्याची चोच लागतेसुद्धा. हे वाचा - मासे पकडायला गेला पण माशानेच पाण्यात खेचून घेतलं आणि...; धडकी भरवणारा VIDEO ज्या माशांना ती आपल्या हाताने भरवण्यासाठी आतुर असते, ते मासे काही तिच्या हातातील खाणं खायला येत नाही. खूप वेळ प्रयत्न केल्यानंतर एक भलामोठा मासा येतो आणि तो चक्क तिचा हातच आपल्या जबड्यात धरून तिला पाण्यात खेचतो. महिला धाडकन पाण्यात कोसळते. त्यावेळी आपल्याही हृदयाची धडधड वाढते. सुदैवाने तिला काही होत नाही. एकंदर व्हिडीओ पाहता माशाने तिला मुद्दाम पाण्यात खेचलं नाही तर तो जेव्हा तिच्या हातातील खाणं खायला येतो. तेव्हा तिचा हातही खेचला जातो आणि त्यामुळे ती पाण्यात पडते. महिलेला आपण पाण्यात पडल्याची भीती वाटत नसेत तर तिच्या चेहऱ्यावर माशाने आपल्या हाताने भरवलेला मासा खाल्ला याचा आनंद झळकताना दिसतो. हे वाचा - VIDEO - ...आणि मगरीने तिला जबड्यात धरून पाण्यातच खेचलं; पुढे जे घडलं ते पाहून अंगावर येईल काटा द रेप्टाइल झूच्या फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही घटना फ्लोरिडातील असल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Viral, Viral videos

    पुढील बातम्या