जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video : झेब्रावर हल्ला करणं मगरीला पडलं महागात, क्षणात गेम फिरला आणि...

Viral Video : झेब्रावर हल्ला करणं मगरीला पडलं महागात, क्षणात गेम फिरला आणि...

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

मुंबई, 22 फेब्रुवारी : सोशल मीडियावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहिले असणार. येथे प्राणींप्रेमींची देखील कमी नाही, त्यामुळे प्राण्यांशी संबंधीत देखील तुम्हाला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. मग हे व्हिडीओ पाळीव प्राण्यांच्या क्यूट क्षणांचे असोत किंवा मग वन्य प्राण्यांच्या थरारक शिकारी. लोक आवडीने असे व्हिडीओ पाहातात. म्हणून तर येथे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जंगलातील व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हे ही पाहा : Video : डझनभर मगरींनी तरुणाला घेरलं, जीव वाचवण्याचा संघर्ष कॅमेरात कैद आपल्याला तर हे माहित आहे की मगर ही पाण्यात राहाणाऱ्या सगळ्यात खरतनाक प्राण्यांपैकी एक आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 फेब्रुवारी : सोशल मीडियावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहिले असणार. येथे प्राणींप्रेमींची देखील कमी नाही, त्यामुळे प्राण्यांशी संबंधीत देखील तुम्हाला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. मग हे व्हिडीओ पाळीव प्राण्यांच्या क्यूट क्षणांचे असोत किंवा मग वन्य प्राण्यांच्या थरारक शिकारी. लोक आवडीने असे व्हिडीओ पाहातात. म्हणून तर येथे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जंगलातील व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. हे ही पाहा : Video : डझनभर मगरींनी तरुणाला घेरलं, जीव वाचवण्याचा संघर्ष कॅमेरात कैद आपल्याला तर हे माहित आहे की मगर ही पाण्यात राहाणाऱ्या सगळ्यात खरतनाक प्राण्यांपैकी एक आहे. बऱ्याचदा जंगलातील राजा देखील घाबरतो आणि लांब राहातो. पण असं असलं तर यावेळी मात्र मगरीला झेब्रावर हल्ला करणं महागात पडलं आहे. तसे पाहाता झेब्रा काही शिकारी प्राणी नाही, त्यामुळे त्या कोणत्याही प्राण्यावर अटॅक करताना तुम्ही पाहिले नसणार. पण या व्हिडीओमध्ये झेब्राने चक्क मगरीवर हल्ला केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही.

जाहिरात

या व्हायरल व्हिडीओमध्ये झेब्रा पाण्यात बसलेला दिसत आहे, तेव्हा त्याच्यावर मगर हल्ला करण्यासाठी तोंड उघडते, मात्र तेव्हाच झेब्रा आपल्या तोंडात मगरीचं तोंड घट्ट पकडून ठेवतो, ज्यामुळे मगरीवर स्वत:ची सुटका करुन घेण्याची वेळ येते. हे सगळं घडत असताना आणखी एक मगर झेब्राजवळ येते. पण ती तेथूनच लांब निघून जाते.

News18लोकमत
News18लोकमत

हा व्हिडीओ सोशल मीडियावर ranthambore_tours नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओला खूप लाइक आले आहेत, तसेच त्याला अनेक शेअर देखील मिळाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात