भोपाळ, 16 नोव्हेंबर : माणूस असो वा प्राणी त्यांच्या पोटी जन्माला येणारा जीव हा त्यांच्यासारखाच असतो. पण कधी प्राण्याच्या पोटी माणसासारखा जीव जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? हे कसं शक्य आहे? असंच तुम्ही म्हणाल. पण आपण विचारही करू शकत नाही किंवा शक्यच नाही असं आपल्याला वाटतं ते प्रत्यक्षात घडलं आहे. मध्य प्रदेशमधील एका बकरीच्या पोटी माणसासारखा जीव जन्माला आला आहे. याचा फोटो व्हायरल होतो आहे.
काही वेळा चार हातापायाचं विचित्र बाळ आणि आठ पायांचे विचित्र प्राणी जन्मल्याचीही प्रकरणं तुम्हाला माहिती असेल. पण बकरीच्या पोटी माणसासारखा जीव, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. विदिशामधील सेमल खेडी गावातील हे विचित्र प्रकरण आहे. गावातील पाळीव बकरीने अशा पिल्लाला जन्म दिला आहे, जे माणसासारखं दिसतं. या बकरीचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली आहे. दूरदूरहून लोक येत आहेत.
हे वाचा - बाबो! हे असं कसं रेडकू? म्हशीच्या विचित्र पिल्लाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी
नवाब खां यांनी पाळलेली की बकरी. या बकरीच्या पिल्लाचा चेहरा माणसांसारखा आहे. पिल्लाचे दोन डोळे आहेत जे माणसांच्या डोळ्यासारखे अगदी बाजूबाजूला आहेत. त्याच्याभोवती काळं वर्तुळही आहे जे काळ्या चष्मासारख्या दिसतं आहेत. याशिवाय तिचं तोंडही माणसांसारखं आहे आणि डोक्यावर भरपूर पांढरे केस आहेत. तिच्या या विचित्र चेहऱ्यामुळे तिला सीरिंजनेच दूध द्यावं लागतं आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार पशूतज्ज्ञ मानव सिंह म्हणाले, या बकरीमध्येजी समस्या दिसते आहे, ज्याला हेड डायस्पेपसिया म्हणतात. 50 हजारांपैकी एक प्राणी या समस्येने ग्रस्त होतो. सामान्यपणे असं गाय-म्हशींमध्ये पाहायला मिळतं. बकरींमध्ये नाही. या समस्येत प्राण्यांचं डोकं सूजतं. गर्भावस्थेत प्राण्यांच्या शरीरात व्हिटॅमिन एची कमी असणं किवा चुकीची औषधं देणं हे याचं कारण आहे.
आसाममध्येही जन्माला आलं होतं असं माणसासारखं दिसणारं बकरीचं पिल्लू
आसामच्या कछार जिल्ह्यातील गंगा नगर गावात एका पाळीव बकरीने अशाच विचित्र पिल्लाला जन्म दिला. बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान होते. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता.
हे वाचा - दुर्मीळ मासा जाळ्यात अडकला आणि पालटलं मच्छिमाराचं नशीब; नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं सांगण्यात आलं. जन्माच्या अर्ध्या तासांनीच ते दगावलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Goat, Madhya pradesh, Pet animal, Viral, Viral news