जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कॅमेऱ्यात दिला खतरनाक लुक! विजय वडेट्टीवारांनी शेअर केला ताडोबातील काळ्या बिबट्याचा हा खास VIDEO

कॅमेऱ्यात दिला खतरनाक लुक! विजय वडेट्टीवारांनी शेअर केला ताडोबातील काळ्या बिबट्याचा हा खास VIDEO

कॅमेऱ्यात दिला खतरनाक लुक! विजय वडेट्टीवारांनी शेअर केला ताडोबातील काळ्या बिबट्याचा हा खास VIDEO

ताडोबा अभयारण्याचं निसर्गवैभव ही महाराष्ट्राची शान आहे. याठिकाणचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. असाच एक काळ्या बिबट्याचा दुर्मीळ व्हिडीओ समोर आला आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

चंद्रपूर, 06 फेब्रुवारी: ताडोबा अभयारण्याचं निसर्गवैभव ही महाराष्ट्राची शान आहे. याठिकाणचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. दरम्यान चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. वडेट्टीवार यांनी ताडोबामध्ये दिसलेल्या दुर्मीळ अशा काळ्या बिबट्याचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व पर्यटनप्रेमींना अशाप्रकारचं निसर्ग वैभव असणाऱ्या ताडोबा अंधारी प्रकल्पाला भेट देण्याचं आवाहन केलं आहे. हा व्हिडीओ तरुण फोटोग्राफर अनुरांग गावंडे यांच्या कॅमेऱ्यातील आहे. हा व्हिडीओ शेअर करताना वडेट्टीवार असं म्हणाले आहेत की, ‘निसर्गवैभव ताडोबा अभयारण्यात आढळलेल्या दुर्मीळ काळया बिबट्याच्या या व्हिडीओने पर्यटकांचे लक्ष ताडोबाकडे वेधले आहे. युवा वन्यजीव छायाचित्रकार अनुराग गावंडे यांनी हे दृश्य त्यांच्या कॅमेरामध्ये कैद केले आहे. राज्यातील इतर पर्यटन प्रेमींनी सुद्धा पर्यटनासाठी ताडोबा ला पसंती देत सहकुटुंब मित्र परिवारासोबत भेट द्यावी.’

भारतीय बिबट्या ही प्राण्यांमधील एक सर्वाधिक असुरक्षित प्रजाती मानली जाते. शिकार आणि बिबट्यांचे अधिवास कमी होणे, ही यामागची महत्त्वाची कारणं आहेत. त्यामुळे ताडोबामध्ये वाइल्डलाइफ फोटोग्राफर अनुरांग गावंडे यांनी टिपलेले हे क्षण फार मोलाचे आहेत. त्यांचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे. ताडोबातील असे अनेक व्हिडीओ नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि ते पर्यटकांना आकर्षित करत असतात. हजारो पर्यटक दरवर्षी ताडोबाला भेट देतात. मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे दीर्घकाळासाठी ताडोबा अंधारी प्रकल्प बंद होता. अनेक निसर्गप्रेमींचा यामुळे हिरमोड झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात