मुंबई 20 डिसेंबर : गुन्हेगारी आणि खुनाच्या अनेक अनपेक्षित घटना समोर येत राहतात, पण विचार करा जर एखादी व्यक्ती लाईव्ह असेल आणि मागून तिचा खून झाला तर कदाचित ही खूप धक्कादायक गोष्ट असेल. तसेच हे प्रकरण पाहून तुम्हाला धक्का देखील बसेल. असेच एक प्रकरण समोर आले आहे, जेव्हा एका फूड ब्लॉगर लाईव्ह व्हिडीओ करत होती, तेव्हा त्याची हत्या करण्यात आली. वास्तविक, ही घटना नेपाळमधील एका भागातील आहे. येथे चीनमध्ये राहणारा एक फूड ब्लॉगर व्हिडीओ बनवत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चायनीज फूड ब्लॉगरचे नाव गॅन सोजिओंग आहे आणि तो सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. हे ही वाचा : घरात रात्रभर दारूची पार्टी, पण सकाळी बायकोचं नवऱ्यासोबत भयानक कृत्य काठमांडू, नेपाळमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांबद्दल बोलत असताना ही संपूर्ण घटना घडली. यादरम्यान असे काही घडले, ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. नक्की तेव्हा काय घडले? हा फूड ब्लॉगर बाजाराच्या मधोमध दुकानदारांशी बोलत होता आणि त्यांच्या डिशची चौकशी करत होता, तेवढ्यात अचानक मागून आवाज आला आणि दुसऱ्याच क्षणी तो जमिनीवर पडला होता. वृत्तानुसार, त्याच्या छातीवर आणि पोटावर धारदार शस्त्राने इतक्या जोरात वार करण्यात आले की तो लगेच जमिनीवर पडला आणि उठू शकला नाही. त्याला घाईघाईत रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याला वाचवता आले नाही. त्याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव फेंग असून तो फूड ब्लॉगर देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही एकमेकांचे स्पर्धक असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना गेल्या आठवड्यात घडली आहे, या घटनेची कसून चौकशी करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.