• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • कोरोनाची काळजी करू नका, रुग्णांनीही मतदान करा; ममता बॅनर्जींचं बंगालमधील जनतेला आवाहन

कोरोनाची काळजी करू नका, रुग्णांनीही मतदान करा; ममता बॅनर्जींचं बंगालमधील जनतेला आवाहन

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या, की मोदी आणि शाह त्यावेळी बंगालवर कब्जा करण्यासाठी योजना आखण्याच्या कामात व्यस्त होते, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं होतं.

 • Share this:
  कोलकाता 26 एप्रिल : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या (West Bengal assembly election 2021) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी रविवारी बोलताना म्हटलं, की आता लोकांचा रस पंतप्रधान मोदींच्या (Narendra Modi) मन की बात कार्यक्रमात नाही. याजागी आता त्यांनी कोविड की बात ऐकायची आहे. कारण, महामारीमध्ये ऑक्सिजन आणि इंजेक्शनच्या कमीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. ममता म्हणाल्या, की राज्यात कोरोना रुग्णांनी मतदान करायला हवं. ममतांनी असा दावा केला आहे, की त्यांनी मुख्य सचिवांना यासाठीची व्यवस्था करण्यासही सांगितलं आहे. त्या पुढे म्हणाल्या, की कोरोनाची काळजी करू नका, मी तुमची रक्षक आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मन की बात या कार्यक्रमात म्हणाले, की कोरोनाची दुसरी लाट देशभर पसरली आहे. त्यामुळे, लोकांनी लस घेणं गरजेचं आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मोदी आणि शाह त्यावेळी बंगालवर कब्जा करण्यासाठी योजना आखण्याच्या कामात व्यस्त होते, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं होतं. बॅनर्जी म्हणाल्या, आता कोणाला मन की बातमध्ये रस आहे. आता सर्वांना कोविड की बात ऐकायची आहे. जर एक हजार लोकांच्या गर्दीत एकजण कोरोनाबाधित आहे तर तो सर्वांना बाधित करू शकतो. केंद्रीय अर्धसैनिक दलाचे दोन लाख जवान उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीसारख्या राज्यांमधून आले आणि ते नकळत विषाणूचे वाहक ठरले असू शकतात. कारण, निवडणूक आयोगानं त्यांची आरटी-पीसीआर तपासणी केलेली नाही. मोफत लस देण्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस, राष्ट्रवादीच्या घोषणेनं वाद? त्या म्हणाल्या, की उत्तर प्रदेशनं स्मशानभूमीच्या चारही बाजूंनी भिंती उभा केल्या आहेत. आसाम आणि त्रिपुरामध्येही अशीच परिस्थिती आहे. त्या पुढे म्हणाल्या, तुमचं नशीब चांगलं आहे, की बंगालमध्ये कोणीही वाटलं गेलेलं नाही. बंगालमध्ये 100 खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी 60 टक्के बेड रिजर्व ठेवण्यास सांगितल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. बॅनर्जी म्हणाल्या, की पीएम म्हणतात, एक राष्ट्र, एक नेता. तर, मग लसीसाठी एक किंमत का नाही? केंद्रासाठी एक आणि राज्यांसाठी वेगळी किंमत का? सगळ्या लसी उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये का जात आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
  Published by:Kiran Pharate
  First published: