मुंबई, 26 ऑगस्ट : कोरोनाच्या (Coronavirus) तिसऱ्या लाटेचा धोका (Corona third wave) आहे. सर्वांनी याचा धसका घेतला आहे. फक्त माणसंच नव्हे तर अगदी प्राण्यांनाही कोरोनाची भीती वाटू लागली असंच वाटतं आहे. कारण चक्क एक माकडही रस्त्यावर मास्क (Monkey wear mask) लावून फिरताना दिसलं. सोशल मीडियावर (Social media) या माकडाचा व्हिडीओ व्हायरल (Monkey video viral) होतो आहे. कोरोनापासून बचावासाठी सर्वसामान्यांच्या हातातील सर्वात मोठं हत्यार म्हणजे मास्क. त्यामुळे लोक मास्क लावूनच घराबाहेर पडत आहेत. आता तर माकडंही मास्क लावू लागले आहेत. एका माकडाने मास्कने फक्त नाक, तोंड नाही तर आपला संपूर्ण चेहराच झाकून घेतला आहे.
Everybody wants to be masked pic.twitter.com/eSGoYY6HOW
— Susanta Nanda (@susantananda3) August 24, 2021
व्हिडीओत पाहू शकता, एक माकड रस्त्यावर फिरतं आहे. रस्त्यावर त्याला एक काळ्या रंगाचं मास्क पडलेलं दिसतं. मास्क पाहून माकड तिथं थांबतं. ते मास्क उचलतं आणि सरळ करून आपल्या चेहऱ्यावर लावतं. हे वाचा - बापरे! महाबळेश्वरच्या रस्त्यावर गाड्यांसमोर आले 2 वाघ; पाहा थरारक VIDEO फक्त आपलं नाक आणि तोंडच नाही तर डोळेही झाकून घेतं. तोंडावर मास्क लावून ते माकड रस्त्यावरून चालू लागतं. मास्क लावण्याची माकडाची हटके स्टाईल सर्वांना आवडत आहे. माकडालाही मास्कचं महत्त्वं समजतं आहे, हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं आहे. हे वाचा - अद्भुत! रंग बदलणारा Octopus पाहिलात का? कॅमेऱ्यात कैद झाला निसर्गाचा चमत्कार अद्याप काही माणसांनाही मास्कचं महत्त्व समजलेलं नाही. काही जण मास्क बिलकुल लावतच नाही आणि लावला तरी तो हनुवटी किंवा मानेवरच जास्त असतो. ते मास्क फक्त नावाला लावतात. पण माणसांना जे समजलं नाही ते प्राण्यांना समजतं आहे, हेच या व्हिडीओतून दिसून येतं आहे. किमान यांच्याकडून तरी सर्वांनी शिकायला हवं.