• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • बॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्यांकडून फुकटचा ओव्हरटाईम

बॉस करायचा ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे, कर्मचाऱ्यांकडून फुकटचा ओव्हरटाईम

आपल्या कर्मचाऱ्यांकडून फुकटात ओव्हरटाईम (Boss used to set timing of office clock 15 min back) करून घेण्यासाठी बॉस ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे करत असल्याचं समजल्यावर कर्मचारी चांगलेच संतापले आहेत.

 • Share this:
  आपल्या कर्मचाऱ्यांकडून फुकटात ओव्हरटाईम (Boss used to set timing of office clock 15 min back) करून घेण्यासाठी बॉस ऑफिसमधील घड्याळ 15 मिनिटं मागे करत असल्याचं समजल्यावर कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. अनेकदा ऑफिसमध्ये कामाचा (Employees had to do free overtime) दबाव असतो. काही ठिकाणी मनुष्यबळ कमी असतं, तर काही संस्थांमध्ये अचानक नवं काम आल्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज निर्माण होते. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाईम करण्याची विनंती करतात आणि त्याचा वेगळा मोबदलादेखील देतात. मात्र एका कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून फुकटात काम करून घेण्यासाठी एका बॉसनं केलेला अगोचरपणा कर्मचाऱ्यांनी उघड केला आहे. घड्याळ करायचा मागे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा हा प्रकार लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांचा चांगलाच संताप झाला. The SUN नं दिलेल्या बातमीनुसार या कंपनीतील बॉसने कर्मचाऱ्यांकडून दर आठवड्यात जवळपास 1.25 तासांचे अधिक काम फुकटात करून घेतलं. असं बदलायचा टायमिंग आपली कैफियत मांडताना एका कर्मचाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. ट्रेनिंगच्या काळात आपल्या सॉफ्टवेअरची वेळ ही खऱ्या वेळेपेक्षा 10 ते 15 मिनिटं पुढं ठेवण्याची सूचना त्यानं सर्वांना केली होती. त्यानुसार सर्वांनी आपापल्या डिजिटल घड्याळात 6.45 ची वेळ सेट केली. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पेमेंट टाईमशिट चेक केली, तेव्हा ही वेळ 7 दाखवत होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी घड्याळाची वेळ 7 वाजता सेट केली. मात्र त्याचेवळी बॉसने सॉफ्टवेअरचं टायमिंग बदललं. दर आठवड्यात दीड तासांचा ओव्हरटाईम पाच दिवसांचा आठवडा या हिशेबाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे आठवड्याला 1.25 तासांतं नुकसान झाल्याची कैफियत कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. वर्षाचा विचार केला तर तब्बल 65 तास कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आणि मोफत काम करवून घेतलं गेल्याचं यातून दिसून येत आहे. हे वाचा- कारच्या सीटला चढवलं जॅकेट, घातली टोपी; कारण वाचून बसेल धक्का नेटिझन्स खवळले ही पोस्ट वाचून नेटिझन्स खवळले आहेत. यावर आतापर्यंत 900 कमेंट्सचा पाऊस पडला आहे. अशा प्रकारांमुळे रक्त खवळत असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे.
  Published by:desk news
  First published: