जाहिरात
मराठी बातम्या / Viral / टेस्टी लागलं म्हणून कपलने रेस्टॉरंटमध्ये खा खा खाल्लं; पदार्थाचं सत्य समजताच बसला मोठा धक्का

टेस्टी लागलं म्हणून कपलने रेस्टॉरंटमध्ये खा खा खाल्लं; पदार्थाचं सत्य समजताच बसला मोठा धक्का

टेस्टी लागलं म्हणून कपलने रेस्टॉरंटमध्ये खा खा खाल्लं; पदार्थाचं सत्य समजताच बसला मोठा धक्का

ऑर्डर देताना कपलची एक छोटीशी चूक पडली महागात.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 08 डिसेंबर : हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर आपण फूड मेन्यू पाहतो आणि एखादा नवीन पदार्थ किंवा कधीही न खाल्लेला पदार्थ खातो. अमेरिकेतील एक कपलही डिनर डेटवर गेलं आणि तिथं त्यांनी त्यांची फेव्हरेट पण कधीही न खाल्लेली डिश खाल्ली. पण त्यावेळी त्यांनी एक चूक केली आणि त्यांची ही चूक त्यांना चांगलीत महागात पडली (Couple misreading dish price). न्यू जर्सीतील एक कपल यूकेतील प्रसिद्ध शेफ गॉर्डन रामसे यांच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर डेटसाठी गेले होतं. जेफरी पेग (Jeffrey Paige) असं या ग्राहकाचं नाव आहे. जेफरी आपल्या पार्टनरसोबत या रेस्टॉरंटमध्ये गेला. पण मेन्यू पाहताना त्यांनी एक चूक केली आणि त्यांना सर्वकाही खाऊन झाल्यावर बिल हातात पडताच त्याचं सत्य समजलं आणि मोठा धक्का बसला. हे प्रकरण गेल्या वर्षीचं आहे पण आता व्हायरल होतं आहे. हे वाचा -  नवऱ्याचं बायकोवरील प्रेम इतकं उतू गेलं की सर्वांसमोर नको तेच घडलं; पाहा VIDEO जेफरीला वाग्यू बीफ खायचं होतं ते खूप स्वस्त होतं. तितक्यात त्याची नजर मेन्यूवरील जापानी A5 वर गेली. ज्याला कोबे असं म्हटलं जातं. A5 हे चांगल्या दर्जाचं बीफ असतं जे खूप महाग असतं. जेफरीने चुकीचं वाचल्याने त्याला या रेस्टॉरंटमध्ये कोबेची किंमत खूपच स्वस्त वाटली आणि त्याच्या पार्टनरलाही ती डिश आवडत होती. त्यामुळे त्यांनी कोबे (Kobe) खाण्याचं ठरवलं.  चार पीसची किंमत जास्तीत जास्त 2500 च्या आसपास असावीस असं त्याला वाटलं. तसंच त्याने कधीच कोबे खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्याने स्वस्त समजून ही डिश ऑर्डर केली. मिरर यूके च्या रिपोर्टनुसार कपलने जेव्हा आपल्या खाण्याचं बिल पाहिलं तेव्हा त्यांना रडूच कोसळलं. त्याने स्वस्त म्हणून जे कोबे खाल्ले त्याची किंमत तब्बल 420 डॉलर होती. त्याने चुकीचं वाचल्याने त्याला या डिशसाठी तब्बल 31,664 रुपये मोजावे लागले. एका चुकीमुळे या कपलचं रेस्टॉरंटमधील एकूण बिल तब्बल  576 डॉलर म्हणजे जवळपास 45 हजार रुपये झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात