कपलनं 123 दिवसांपर्यंत हात बांधून सोबत राहात बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, मात्र नाही टिकवू शकले नातं

दोघांनी एकमेकांना हातकडी बांधून (couple handcuff themselves to each other) घेतली होती. इतक्या दिवस हातकडी घालून पार्टनरसोबत राहण्याचा या प्रेमी जोड्यानं वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवला आहे.

दोघांनी एकमेकांना हातकडी बांधून (couple handcuff themselves to each other) घेतली होती. इतक्या दिवस हातकडी घालून पार्टनरसोबत राहण्याचा या प्रेमी जोड्यानं वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवला आहे.

  • Share this:
    युक्रेन 18 जून : प्रेमाला कोणतीही बंधनं नसतात, असं म्हटलं जातं. मात्र, आता समोर आलेलं एक प्रकरण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. या घटनेत एका जोडप्यानं 123 दिवस एकमेकांच्या हाताला हात बांधून घालवले. या दोघांनी एकमेकांना हातकडी बांधून (couple handcuff themselves to each other) घेतली होती. सोशल मीडियावर या कपलची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. इतक्या दिवस हातकडी घालून पार्टनरसोबत राहण्याचा या प्रेमी जोड्यानं वर्ल्ड रेकॉर्ड (World Record) बनवला आहे. द सनमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, 33 वर्षाच्या अलेक्जेंडर आणि 29 वर्षाच्या विक्टोरिया यांनी 123 दिवस आधी युक्रेनची राजधानी कीवमध्ये यूनिटी स्मारकाच्या समोरच एकमेकांच्या हातात हातकडी घातली. दोघांनीही पुन्हा तिथेच जाऊन ही हातकडी सोडली. हे दोघेही एकमेकांपासून विभक्त होण्यासाठी अतुरतेनं वाट पाहत होते. ही हातकडी खोलताच दोघांनीही ब्रेकअपची घोषणा केली आणि आनंद व्यक्त केला. हातकडी खोलल्यानंतर विक्टोरियानं म्हटलं, की कोणत्याही बंधनांशिवाय मला जीवन जगायचं आहे. आता मी मोकळी आहे. मी आणखी वाट पाहू शकत नव्हते. तर, अलेक्जेंडरनं म्हटलं, की हातकडी लावून सोबत राहाण्याची कल्पना माझीच होती. विक्टोरियाला माझ्यापासून विभक्त व्हायचं होतं. त्यामुळे, तिच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी मी हा पर्याय निवडला. मात्र, माझा हा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, मी माझ्या फॉलोअर्सचे आभार मानतो. आम्ही दोघंही आता आनंदी आहोत. हा अनुभव मी नेहमी लक्षात ठेवेल. शस्त्रक्रिया करून माणूस नाही तर श्वानाचं घटवलं वजन, पुण्यातील डॉक्टरांना यश बॉयफ्रेंडनं पुढे सांगितलं, की जवळपास चार महिने आम्ही सतत सोबत होतो. आमच्यात पर्सनल स्पेससारखं काहीच नव्हतं. आम्ही अगदी बाथरुमपासून ग्रॉसरी विकत घेण्यापर्यंत सर्व ठिकाणी एकत्र जायचो. मात्र, प्रायव्हसीच मिळत नसल्यानं दोघंही कंटाळलो होतो. मी तिच्या कित्येक वेळ मेकअप करण्याच्या सवयीमुळे नाराज असायचो. भांडणं होऊ नये यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. भररस्त्यात दोघींचा तुफान राडा, महिलेच्या डोक्यात फोडली काचेची बाटली अन्... या कपलनं वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. ते आता केवळ यूक्रेनमध्येच नाही तर जगभरातील हातकडी घालून इतका अधिक काळ एकसोबत राहाणारं पहिलं कपल ठरले आहेत. दोघांनीही असा विचार करून ही हातकडी बांधली होती, की ही खोलताना ते दोघंही लग्नबंधनात अडकतील.
    Published by:Kiran Pharate
    First published: