मुंबई, 23 मे : नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं आणि चढ उतार तर येतातच. पण यासगळ्यावर मात करत ते पुढे निघून गेले की नातं सुरळीत चालू लागतं. पण आयुष्यात कधी कधी अशी वादळे येतात, जी माणसाला आतून तोडून टाकतात. ब्रिटनमधील एका जोडप्यासोबत असेच घडलं. या व्यक्तीने आपल्या पत्नीबद्दल एक धक्कादायक गोष्ट शेअर केली. त्या व्यक्तीला आपल्या बायकोबद्दल असे एक रहस्य कळले, जे ऐकून त्याला धक्काच बसला. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीलाही हे रहस्य माहीत नव्हते. सत्य समोर आल्यानंतर तिलाही धक्का बसला. रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील एका जोडप्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर त्यांची कहाणी शेअर केली आहे. या जोडप्याने सांगितले की, डीएनए चाचणीने त्यांच्या वैवाहिक जीवनात कशी दहशत निर्माण केली. या चाचणीच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट तर समोर आलीच पण सासू-सासरे यांच्यातील नात्याचीही माहिती मिळाली. जंगली प्राण्यांना पाळणं महागात पडलं, मांस घालायला गेला आणि त्याची उरली 2 हाडं या माणसाचे पहिले लग्न टिकले नाही. यानंतर त्याने घटस्फोटित महिलेशी दुसरे लग्न केले. दोघांना पहिल्या लग्नापासून मुले आहेत. यानंतर या व्यक्तीच्या मनात वंशावळी म्हणजेच वंशवृक्ष जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी डीएनए टेस्ट केलं तेव्हा त्याची बायको ही त्याची प्रत्यक्षात त्याची चुलत बहीण असल्याचे तपासात समोर आले. इतकंच नाही तर त्याची आई आणि पत्नीची आई दुरच्या नात्यातल्या बहिणी असल्याचं समजतं. या व्यक्तीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, त्याचे कुटुंब आणि पत्नीचे कुटुंब एकाच भागातील आहे. त्यांच्यात आधीच संबंध होते. डीएनए चाचणी समोर आल्यावर त्यांनी कुटुंबाबद्दल माहिती मिळवायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्याची दुसरी आई आणि त्याची सासू या दोघांचेही डीएनए मॅच झाले आहेत. म्हणजेच त्या सावत्र बहिणी असल्याचे उघड झाले.
त्यांच्यासमोर इतके मोठे सत्य समोर येऊन सुद्धा त्यांनी ही गोष्ट घरच्यांना न सांगण्याचा निर्णय घेतला आणि आपलं नातं तसच चालू ठेवलं.