मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पैसे वाचवून कपलनं खरेदी केलं नवं घर; किचनमधील कपाट उघडताच बसला धक्का

पैसे वाचवून कपलनं खरेदी केलं नवं घर; किचनमधील कपाट उघडताच बसला धक्का

कपलनं आपल्या घराचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत. या घरातील किचनच्या कबर्डच्या मागे एक सिक्रेट रूमचा रस्ता (Couple Found Secret Room Behind Kitchen Cupboard) मिळाला

कपलनं आपल्या घराचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत. या घरातील किचनच्या कबर्डच्या मागे एक सिक्रेट रूमचा रस्ता (Couple Found Secret Room Behind Kitchen Cupboard) मिळाला

कपलनं आपल्या घराचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत. या घरातील किचनच्या कबर्डच्या मागे एक सिक्रेट रूमचा रस्ता (Couple Found Secret Room Behind Kitchen Cupboard) मिळाला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 27 ऑक्टोबर : घर विकत घेणं हे कोणत्याही माणसाचं स्वप्न असतं. लोक अनेक वर्ष वाचवून आपल्या स्वप्नाचं घर खरेदी करतात. मात्र, यूकेमध्ये (United Kingdom) राहणाऱ्या कपलनं कधीच विचार केलं नाही की ज्या घरात ते जात आहेत, तिथे त्यांनी एक सिक्रेट जग पाहायला मिळेल. या कपलनं आपल्या घराचे फोटो ऑनलाईन शेअर केले आहेत. या घरातील किचनच्या कबर्डच्या मागे एक सिक्रेट रूमचा रस्ता (Couple Found Secret Room Behind Kitchen Cupboard) मिळाला. हा रस्ता त्यांना घरात शिफ्ट झाल्यानंतर काही दिवसांनी दिसला. दोघंही हे पाहून हैराण झाले. याबद्दल त्यांना घराच्या आधीच्या मालकानं काहीही सांगितलं नव्हतं.

वारंवार डिवचत होता व्यक्ती; सापानं केला हल्ला अन्..; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

काही दिवसांपूर्वीच या कपलनं हे घर खरेदी केलं. यानंतर घराचं इंटिरिअर करून दोघंही तिथे शिफ्ट झाले. मात्र, यानंतर काही दिवसांनी अचानक त्यांना फ्लॅटच्या किचनमध्ये एक सिक्रेट रूम आढळली. या रूमचा दरवाजा किचनच्या कबर्डच्या मागे होता. या सिक्रेट दरवाजाला एक खिडकीदेखील होती. कपल जेव्हा याच्या आतमध्ये गेलं तेव्हा त्यांना आपल्या वेल फर्निश्ड फ्लॅटपेक्षा अगदीच वेगळी दुनिया दिसली. आतमधील रूममध्ये फ्लोरिंग नव्हतं. सोबतच रूममध्ये भरपूर सामानही ठेवलेलं होतं.

Yahoo News Australia नं दिलेल्या वृत्तानुसार, एका महिलेनं याचा फोटो फेसबुक ग्रुपवर शेअर केला होता. ‘Things Found In Walls – And Other Hidden Findings’ नावाच्या पेजवरुन याचे फोटो अपलोड केले गेले. इथूनच हे फोटो व्हायरल झाले आहेत. महिलेनं फोटो शेअर करत लिहिलं, की नुकतंच मी माझ्या प्रियकरासोबत मिळून हा फ्लॅट खरेदी केला. मात्र, पाहा किचनच्या कबर्डमध्ये आम्हाला काय मिळालं. यासोबतच महिलेनं लिहिलं की जेव्हा हा फ्लॅट ते सोडून जातील तेव्हा याठिकाणी येणाऱ्या नव्या व्यक्तीसाठी अनेक सरप्राईज ठेवून जातील.

Dating Website वरील प्रोफाईल पाहून भडकला युवक; दाखल केला गुन्हा

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी यावर वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, की हे भूताचं घर आहे का? तर एका महिलेनं हे स्टडी रूम किंवा सिक्रेट रूममध्ये बदलण्याचा सल्ला दिला. एक व्यक्तीनं लिहिलं, की बायकोपासून लपण्यासाठी ही परफेक्ट जागा आहे. यूकेमध्ये अनेक अशी घरं आढळतात ज्यामध्ये सिक्रेट रूम असते.

First published:

Tags: Photo viral, Vroom vroom