जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच...; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त

VIDEO : नवरा-नवरीला चढला जोश, विमानातच...; प्रवाशांना वाटली लाज, नेटिझन्सही संतप्त

नवरा-नवरीचं विमानात असं कृत्य.

नवरा-नवरीचं विमानात असं कृत्य.

नवरा-नवरीचा विमानातील हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

मुंबई, 06 एप्रिल :  नवरा-नवरी चे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. किंबहुना हा व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्स संतप्त झाले आहेत. वधू-वराने विमानात असं काही केलं की त्यांचं कृत्य पाहून नेटिझन्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. असं या कपलने नेमकं प्लेनमध्ये काय केलं आहे ते पाहूयात. लव्ह इज इन द एअर, असं इंग्रजीत म्हटलं जातं. असंच काहीसं या विमानात पाहायला मिळालं. एका दाम्पत्याने विमानात जे केलं ते थक्क करणारं आहे. लग्नाआधी नवरा-नवरीचं कृत्य पाहून विमानातील इतर प्रवासीही थक्क झालेत.  व्हिडीओत तुम्ही पाहू शकता विमानात अगदी पुढच्या भागावर हे दाम्पत्य उभं आहे. प्रवासी सीटवर बसले आहेत. त्याच प्रौढ नागरिकही दिसत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

@anchor_jk इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही फ्लाइट पूर्णपणे लग्नासाठी बुक करण्यात आली आहे. विमानात नवरा-नवरीसह त्यांचं कुटुंब, नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे. विमान 36,000 फूट उंचावर आहे. VIDEO - नवरदेव वरात घेऊन दारात अन् धावत बाल्कनीत गेली नवरी; पुढे असं काही घडलं की… विमान हवेत उडताच आकाशात नवरदेवाने नवरीला अनोख्या पद्धतीने प्रपोज केलं. त्यानंतर दोघंही रोमँटिक डान्स करताना दिसले. मेरी जान या गाण्यावर ते थिरकत आहेत. सर्वकाही विसरून अगदी बेभान होऊन ते एकमेकांसोबत नाचत आहेत. एकमेकांमध्ये ते इतके बुडाले आहेत की त्यांना कुणाचंही भान राहिलेलं नाही. त्यांना असं काही करताना पाहून विमानात असलेले त्यांचे वयस्कर नातेवाईकांनाही लाज वाटत असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहेत. हा व्हिडीओ काही जणांना आवडला आहे, तर काही जण भडकले आहेत. प्रवाशांच्या अशा कृत्यामुळे क्रू मेंबर्सला जबाबदार ठरवलं जातं, असं काही युझर्सनी म्हटलं आहे. पाहताच नवरदेवाने शरमेने बंद केले डोळे, नवरीही स्तब्ध; भरमंडपात स्क्रिनवर दिसला त्यांचा Private Video वयस्कर माणसांसमोर असं काही करायला लाज वाटत नाही, असा सवालही एका युझरने विचारला आहे. एका युझरने हे सर्व करण्यासाठी एखादं हॉटेल रूम बुक करायची ना, असंही म्हटलं आहे.

जाहिरात

तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात