दिल्लीतील रस्ते पाहून व्हाल हैराण! एका रात्रीत पसरली बर्फाची चादर, पाहा VIDEO

दिल्लीतील रस्ते पाहून व्हाल हैराण! एका रात्रीत पसरली बर्फाची चादर, पाहा VIDEO

शिमला, मनाली नाही तर चक्क दिल्लीत मुसळधार पावसानंतर झाली बर्फवृष्टी.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे : देशात कोरोनाचं महासंकट आहेत तर दुसरीकडे सतत बलणारं हवामान आणि पावसाचं संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात कामालीचे बदल होत आहेत. वादळी-वाऱ्यासह पाऊस आणि वाढणारी उष्णता याचा परिणाम लोकांच्या शरीरावरही होत आहे. शिमला-मनाली आणि काश्मीरसारखी बर्फवृष्टी चक्क दिल्लीत गुरुवारी झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीमध्ये गुरुवारी संध्याकाळी अचानक मुसळधार पावसानंतर गारा पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर बर्फ पडायला लागला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शिमला, श्रीनगर नाही तर दिल्लीतही बर्फवृष्टी झाल्याचं या व्हिडीमध्ये पाहायला मिळत आहे. कमलानगर आणि वैशाली परिसरात गुरुवारी वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस झाला. त्यानंतर गारपीटही झाली. दिल्लीतल्या एका रस्त्यावर अक्षरश: बर्फाची चादर पसरल्याचं दृश्यं पाहायला मिळालं.

एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामध्ये वातावरणात होणारे हे बदल आणखीन घातक असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील हवामानात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी खूप उकाडा तर कधी मुसळधार पाऊस आणि आता तर बर्फवृष्टी झाल्यानं वातावरण पूर्ण बदललं आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही कोरोनामुळे काहीशी चिंताही सतावत आहे.

हे वाचा-डॉक्टरने दाखवलं मास्क वापरण्याचं प्रात्यक्षिक, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

हे वाचा-गुगल ट्रान्सलेट आहे का? Idali Dosa Batter च्या हिंदी भाषांतराचा फोटो व्हायरल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 15, 2020, 11:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading