Home /News /viral /

कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून 'हा' मुंबईकर तरूण झाला स्टार

कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून 'हा' मुंबईकर तरूण झाला स्टार

14 दिवस क्वारंटाइन सेंटरमध्ये राहिला आणि व्हिडीओ बनवून हा तरूण झाला स्टार.

  मुंबई, 19 जून : कोरोना म्हटलं की भीती, क्वारंटाइन आणि लस याच गोष्टी डोळ्यासमोर येतात. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून ज्या पद्धतीनं लोकं घराबाहेर पडत आहे, त्यावरून लोकांच्या मनातून कोरोनाची भीतीही कमी होत चालली आहे की काय, असा प्रश्न पडतो. एकूणच काय तर आपण कोरोनासोबत जगण्याची सवय करून घेत आहोत. एकीकडे कोरोना वॉरिअर्स आपली सेवा करत असताना सध्या सोशल मीडियावर मात्र एका मुलाची तुफान चर्चा आहे. हा मुलगा फक्त 14 दिवसात प्रसिद्ध झाला तेही कोरोनामुळं. विश्वास नाही बसत? सध्या कोरोना संशयित किंवा सौम्य लक्षणं असलेल्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं जात आहे. जेणेकरून त्यांच्यामुळं कोरोनाचा प्रसार होऊ नये. असाच एक मुंबईकर मुलगा क्वारंटाइन सेंटरमध्ये स्टार झाला आहे. तेही केवळ व्हिडीओ तयार करून.
  @mumbaiboymjcovid19 ##covid19 ##coronavirus ##foryou ##foryoupage ##trending ##tiktokindia ♬ original sound - Mr. Suleman Pathan
  तुम्ही सोशल मीडियावर mumbaiboymj नावाच्या मुलाचे TikTok व्हिडीओ पाहिले असतील. हा मुलगा क्वारंटाइन सेंटरमध्ये रोज एक व्हिडीओ तयार करतो. यात सकाळी काय करतात, ते दिवस कसा घालवतात, याबाबत मजेशीर पद्धतीनं भाष्य केलेले असतं. एवढंच नाही तर तो कोरोनावर गाणंही तयार करतो, नाचतोही.
  @mumbaiboymjcoronatin...hum tere pyar me##foryou ##foryoupage ##trending ##tiktokindia @tiktok_india ♬ Deewane Tere Naam Ke - Sukhwinder Singh
  हा तरूण मास्क, गोल्व्ज घालून व्हिडीओ तयार करतो. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुख्य म्हणजे, या व्हायरल व्हिडीओमधून त्याला पैसही मिळत आहेत. त्यामुळं कोरोनामुळं या तरूणाचा फायदा झाला आहे. त्याचबरोबर टीकटॉक व्हिडीओच्या माध्यमातून तो लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे संदेशही देत आहे.
  @mumbaiboymjcovid19##foryou ##foryoupage ##tiktokindia ##trending ##coronavirus @tiktok_india ♬ original sound - savitabhagwat
  नुकत्याच एका व्हिडीओमध्ये त्यानं त्याला सौम्य लक्षणं असून, तो आता बरा आहे असे सांगितले आहे. त्याला एका पालिकेच्या शाळेत क्वारंटाइन ठेवले असून, येथील व्यवस्था उत्तम असल्याचेही त्याने सांगितले. एकीकडे क्वारंटाइन सेंटरमधून रुग्ण पळून गेल्याच्या बातम्या येत असताना, हा तरूण मात्र आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करत आहे. संपादन-प्रियांका गावडे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या