नवी दिल्ली, 18 एप्रिल : देशात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे (coronavirus) 3 मे पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. गेल्या 22 मार्च पासून लॉकडाऊन असल्यामुळे भारतीय रेल्वे देखील बंद ठेवण्यात आलेला आहे. यामुळे भारतीय रेल्वेचे ( Indian Railway) दररोज नुकसान होत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. भारतीय रेल्वेतील सर्व कर्मचार्यांच्या पगाराला आणि इतर भत्त्यांवर कात्री लावण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. कोरोनाव्हायरस लॉकडाऊनमुळे रेल्वेने झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये भारतीय रेल्वेने 13 लाख कर्मचाऱ्यांचा भत्ता रोखण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने 13 लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचार्यांच्या पगारावर आणि भत्त्यावर बंदी घालण्याची योजना आखली आहे. त्याअंतर्गत टी ए ( प्रवास भत्ता ) आणि डीए ( दैनंदिन भत्ता ) तसेच ओव्हरटाईम ड्युटीचा भत्ता रद्द करण्यात करण्यात येणार आहे. रेल्वे चालक आणि रक्षकांना गाड्या चालविण्यासाठी प्रत्येक किलोमीटर भत्ता बंद करण्याचीही रेल्वे मंत्रालयाने योजना आखली आहे. त्याशिवाय रेल्वे यापूर्वीच आर्थिक अडचणीत जात आहे. त्यामुळे आता ओव्हरटाईम ड्युटीसाठी मिळणार भत्ता 50 टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं कळतंय. हेही वाचा- कोरोनाबाधितांचे आकडे वाढत असतानाच पुण्यासह देशभरातून आली आनंदाची बातमी भारतीय रेल्वेने हे सर्व वेतन भत्ते 6 महिन्यांसाठी रोखण्याची शिफारस केली आहे. या व्यतिरिक्त पगार 10 टक्के वरून 35 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय उपलब्ध असणाऱ्या इतर सुविधांमध्ये 50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आहे. कोरोनामुळे जगभरात मंदीचं सावट कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगावर मंदीचे सावट आलं आहे. त्याचा परिणाम लाखो बालकांच्या आरोग्यावरही होण्याची भीती आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे हजारो कुटुंबे गरिबीमध्ये ढकलली जाणार असून, त्यातून आरोग्याच्या समस्यांमुळे हजारो बालकांचा मृत्यू होण्याची भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे. काही वर्षांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश आले होते. आता पुन्हा हे प्रमाण वाढणार असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी 38.6 कोटी बालके दारिद्र्यामध्ये होती. सध्याच्या परिस्थितीमुळे 4.2 ते 6.6 कोटी बालके टोकाच्या गरिबीमध्ये ढकलली जाणार आहेत. संपादन- अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.