मुंबई, 06 मे : आपल्या लहानपणी सर्वात आवडते बैठी खेळ म्हणजे कॅरम आणि लुडो. मात्र सध्या सगळीच लहान मुलं मोबाईल गेममध्ये गुंतलेली दिसतात आणि मोठे अजूनही कॅरम खेळताना. विरंगुळा आणि स्पर्धा म्हणजे कॅरम. क्वीन कोण काढता यामध्ये स्पर्धा रंगते. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनदरम्यान घरी पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्याची संधी मुलांना आणि कुटुंबीयांना मिळाली आहे. पण ज्यांच्याकडे कॅरम नाही आणि तरीही त्यांना खेळायचा असेल तर कसा खेळला जाईल. याचा विचार आपण केला का?
कॅरम नाही म्हणून मुलांनी चक्क जमिनीचा कॅरम आणि मुलांच्या सोंगट्या केल्या आहेत. ही भन्नाट आयडिया वापरून कॅरम खेळण्याचा आनंद मुलं आणि त्यांच्यासोबत मोठे लोक घेताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ टिकटॉकच नाही तर सगळ्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता. कॅरमचं चित्र जमिनीवर काढलं आहे. आणि चार जण खेळण्यासाठी उभे आहेत. तर या जमिनीवर कॅरमच्या मध्ये बाकी मुलं उभी आहेत. स्टाईकरची भूमिका एका मुलानं निभावली आहे. या मुलाला ढकललं जातं. तो ज्या दिशेनं जातो तिथल्या मुलांची जागा बदलते. काही मुलं गोल केलेल्या जागी जातात तर काही मुलं अस्ताव्यस्त उभी राहतात. असा कॅरम आयुष्यात कधीही खेळला नसेल. या मुलांनी असा भन्नाट पद्धतीनं कॅरम खेळण्याचा आनंद लुटला आहे.
हे वाचा-मांजर आणि साप आले समोरासमोर...लढाईत कोणी मारली बाजी, पाहा कधीच न पाहिलेला VIDEO
हे वाचा-'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Tik tok, Viral video.