मांजर आणि साप आले समोरासमोर...लढाईत कोणी मारली बाजी, पाहा कधीच न पाहिलेला VIDEO

मांजर आणि साप आले समोरासमोर...लढाईत कोणी मारली बाजी, पाहा कधीच न पाहिलेला VIDEO

साप आणि मांजर समोरसमोर आल्यानंतर नेमकं कोणी बाजी मारली या युद्धात कोण जिंकलं पाहा व्हिडीओ.

  • Share this:

इंदूर, 06 मे : साप आणि मुंगुस यांच्या लढाईचे अनेक व्हिडीओ आपण पाहातो. पण साप आणि मांजराच्या लढाईतला व्हिडीओ पाहायला मिळणं फारच दुर्मीळ असतं. काही दिवसांपूर्वी साप आणि मांजर यांच्यातील मैत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये मांजर आणि साप एकत्र झोपले होते. आज साप आणि मांजर यांच्यातील लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता नाग जात असताना मांजर त्याला अडवते. मांजर नागासोबत खेऴण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मांजर सापाला मारते. साप आणि मांजर समोरसमोर आल्यानंतर नेमकं कोणी बाजी मारली या युद्धात कोण जिंकलं पाहा व्हिडीओ.

हे वाचा-'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO

हा व्हिडीओ इंदूरमधील असल्याची माहिती मिळत आहे. मात्र नागही प्रतिहल्ला करतो आणि त्यातून लढाई सुरू होते. मांजर अंगावर येत असल्याचं पाहून नाग शेवटी आपल्या वाटेनं निघून जातो. मांजराचं मात्र समाधान होत नाही. नागाचा शोध घेत मांजरही नागाच्या मागे जातं. नाग झुडुपात गेल्यानं मांजराला दिसेनासा होतो. त्यांच्या लढाईचा व्हिडीओचा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा-अखेर पठ्ठ्याला मिळाला दारूचा खंबा, मग रस्त्यावरच असं काही केलं की... पाहा VIDEO

First published: May 6, 2020, 1:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading