बैतूल, 22 मे : कोरोनाच्या महासंकटात एकीकडे माणुसकीचं दर्शन होत असतानाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी एका युवकाला अमानुषपणे मारहाण करून त्याच्या गळ्यात धोंडा बांधून गावभर वरात काढल्याचा प्रकार उघडकीस आला. या युवकाला वाचवण्यासाठी एकही जण पुढे सरसावला नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील बैतूलच्या भैंसदेही गावातील आहे. ग्रामस्थांच्या तावडीतून सुटत मारहाणीमुळे जखमी झालेल्या तरुणानं कसंबसं पोलीस स्थानक गाठलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या युवकाचं नाव नंदू चिल्हाते आहे. हा ढोलना गावचा रहिवासी आहे. नंदूनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ग्रामस्थांनी त्याचं म्हणणं ऐकून न घेता त्याला बेदम मारहाण केली. अमानुषणपे मारहाण करून त्याच्या गळ्यात 40 किलोचा दगड बांधून त्याला गावभर फिरवण्यात आलं. गावात असलेल्या पंचायतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात पंप ऑपरेट करण्याचं काम नंदू या युवकाकडे होतं. त्याला काही कारणास्तव पंचायतीनं कामावरून काढून टाकल्यानं तो त्रस्त होता. त्याच दरम्यान नंदूला नोकरीवरून काढून टाकलं तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत अशा आशयाचं गावकऱ्यांना एक धमकीचं पत्र मिळालं. या पत्रामुळे गावात अफवा पसरली आणि संतप्त ग्रामस्थांनी कोणताही विचार न करता नंदू नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. हे वाचा- घर गाठण्यासाठी उपाशीपोटी 780 किमी चालला मजूर, 10 दिवसांनी समोर दिसलं घर पण… या पत्राचा पाठपुरावा न करता आणि कोणतीही चौकशी न करता केलेल्या बेदम मारहाणीमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. या मॉब लिंचिंगचा बळी होता होता युवक वाचला. त्यानं ग्रामस्थांच्या तावडीतून स्वत:ला सोडवून घेत थेट पोलीस स्थानक गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. धक्कादायक म्हणजे या अत्याचाराविरोधात गावातील एकाही व्यक्तीनं आवाज उठवला नाही. उरलेल्यांनी बघ्याची भूमिका घेतली. युवकाच्या तक्रारीनंतर पोलिस आता या प्रकरणाचा तपास करत असून नामित आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे वाचा- उसाच्या शेतात विवस्त्र अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह, सांगली जिल्हा हादरला संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







