Home /News /national /

घर गाठण्यासाठी उपाशीपोटी 780 किमी चालला मजूर, 10 दिवसांनी समोर दिसलं घर पण...

घर गाठण्यासाठी उपाशीपोटी 780 किमी चालला मजूर, 10 दिवसांनी समोर दिसलं घर पण...

7 दिवस पोटात अन्नाचा एक कण नाही तरी चालत केला 780 किमी प्रवास.

    आजमगढ, 22 मे : कोरोनाला रोखण्यासाठी देशात सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन लागू करण्याता आला आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा प्रवासी मजुरांवर झाला आहे. परराज्यात अडकलेले मजूर मिळेल त्या मार्गानं घरी जात आहेत. या मजुरांना ना पाणी मिळत आहे ना अन्न, उपाशीपोटीच त्यांना प्रवास करावा लागत आहे. अशाच एका परप्रांतीय मजुरानं पानिपतहून दहा दिवस प्रवास करून आजमगड जिल्ह्यातील आपल्या गावी पोहोचला. या 10 दिवसात मजूरला फक्त 3 दिवसांचं जेवण मिळालं. 7 दिवस या मजुरानं उपाशीपोटी 780 किलोमीटरचा प्रवास केला. रामकेश गोंड असं या मजुराचं नाव आहे. रामकेश हरियाणाच्या पानिपत इथं मोटर पार्ट्स कंपनीत काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम थांबलं तर हळूहळू पैसे संपू लागले. त्यामुळं घरी जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. घरासमोर पोहचल्यानंतर मात्र रामकेशची तब्येत बिघडली. जेव्हा रामकेशने गावातल्या  मित्रांकडे प्रवासाची व्यथा सांगितली तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. मालकानं भेटणं केलं बंद रामकेश हरियाणाच्या पानिपत येथे मोटार पार्ट्स कंपनीत बर्‍याच वर्षांपासून काम करत होता. मात्र लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. हे काम लवकरच सुरू होईल या आशेवर कामगार पानिपतमध्येच थांबले. वारंवार लॉकडाऊन वाढल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडली. मजुरांकडे असलेले सर्व पैसे खर्च झाले. कंपनीच्या मालकाने कामगारांना भेटणे बंद केले. त्यामुळं रामकेश आणि त्याच्या सहकाऱ्यांना उपाशी राहण्याची वेळ आली. त्यामुळं सर्वांनी चालत घरी जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी अडवलं आणि... रामकेश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकवेळा मालकाशी संपर्क साधला. मात्र संपर्क झाला नाही, म्हणून त्यांनी चालत घर गाठवण्याची तयारी केली. चालत जात असताना रामकेश आणि त्याचे सहकारी मध्ये-मध्ये ट्रक आणि इतर गाड्यांमधून प्रवास करत होते. अशा प्रकारे ते सुल्तनापूर जनपदपर्यंत पोहचले. त्यानंतर रामकेशला पोलिसांनी अडवलं, आणि बसमध्ये बसवलं. त्यानंतर रामकेश आणि त्याचे सहकारी आजमगढला पोहचले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या