जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लॉकडाऊनमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा, VIDEO VIRAL

लॉकडाऊनमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा, VIDEO VIRAL

लॉकडाऊनमध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी खेळला गरबा, VIDEO VIRAL

रुग्णांचं मनोरंजन करण्यासाठी सूरतमधील डायमंड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रात्री गरबा खेळला

  • -MIN READ
  • Last Updated :

सूरत, 09 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत भारतात 5 हजार 734 कोरोनाग्रस्त असून त्यापैकी 1135 रुग्ण महाराष्ट्रातले आहेत. आतापर्यंत भारतात कोरोनामुळे 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. 411 रुग्ण कोरोनाविरुद्धचा लढ यशस्वीपणे लढले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सूरतमध्ये लॉकडाऊनदरम्यान रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांचं मनोरंजन करण्यात आलं. रुग्णांचं मनोरंजन करण्यासाठी सूरतमधील डायमंड रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रात्री गरबा खेळला त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे देशभरात कोरोनाचा धोका वाढत आहे. सोशल डिस्टन्स ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून आवाहन केलं जात असतानाही रुग्णालयात गरबा खेळला आहे. आधीच कोरोनाचा धोका वाढत असताना रुग्णालयातच अशा पद्धतीनं गरबा खेळला जात आहे.डायमंड रुग्णालयातील गरब्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हे वाचा- ‘आणखी मृतदेह नको असतील तर…’, ट्रम्प यांच्या टीकेवर WHOचा पलटवार

जाहिरात

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने राज्यातील 15 जिल्ह्यांमधील हॉटस्पॉट भाग सील करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री 12 ते 15 एप्रिल रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत हे भआग सील करण्यात आले आहेत. देशभरात गेल्या 24 तासांत 773 नवीन नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 32 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हे वाचा- बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णालाही क्वारंटाइन आवश्यक; घरी कशी घ्यावी काळजी? संपादन- क्रांती कानेटकर.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात