Coronavirus: बऱ्या झालेल्या रुग्णालाही होम क्वारंटाइन आवश्यक; घरी कशी घ्यावी काळजी?

Coronavirus: बऱ्या झालेल्या रुग्णालाही होम क्वारंटाइन आवश्यक; घरी कशी घ्यावी काळजी?

कोरोनाव्हायरस रुग्णांवर (Coronavirus patient) यशस्वी उपचार करून घरी येत आहेत. पण घरी आल्यावरही त्यांना किमान 14 दिवस होम क्वारंटाइन करावं लागतं. कोरोनामुक्त झाल्यानंतर कशी घ्यावी काळजी?

  • Share this:

मुंबई, 09 एप्रिल: कोरोनाव्हायरसची (coronavirus) लक्षणं दिसण्याचा कालावधी हा 14 दिवसांचा आहे. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणं कोरोनाव्हायरसची आहेत. मात्र याचा अर्थ कोरोनाव्हायरस असेलच असं नाही. त्यामुळे अनेकांना अशी लक्षणं दिसल्यानंतर घरातच सर्वांपासून वेगळं राहण्याचा सल्ला दिला जातो. तर ज्या कोरोनाव्हायरस रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आलं आहे, त्यांनाही घरात 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आलं आहे. कोरोनामुक्त झालेली व्यक्ती जेव्हा घरी येते, तेव्हा विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

घरातील एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली किंवा कोरोनाग्रस्त रुग्ण घरी परतल्यानंतर काय काळजी घ्यावी, याबाबत न्यूयॉर्क टाइम्समध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

कोरोनाव्हायरसारखी सौम्य लक्षणं दिसली असतील आणि चाचणी झाली नसेल तरी स्वत:ला घरात सर्वांपासून वेगळं ठेवावं आणि आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी.

अशा व्यक्तींना मानसिक आधार द्या,  तसंच आहारात द्रवपदार्थ जास्त द्या. त्यांचं तापमान सातत्याने तपासा. सामान्य फ्लूच्या वेळी  आपण जे काही करतो तसंच सर्व करा.

जर ती व्यक्ती खातपित नसेल, अशक्त झालेली असेल, तिची प्रकृती गंभीर असेल तर तात्काळ डॉक्टरांना कळवा.

त्या रुग्णाला शक्यतो वेगळी खोली द्यावी. शक्य नसेल तर त्या व्यक्तीपासून दूर राहावं, जास्त संपर्कात येऊ नये. तसंच रुग्णाचा वावर असलेली जागा नियमित sanitize करावी. घरात मोकळी खेळती हवा असावी.

शक्य असल्यास रुग्णासाठी बाथरूमही वेगळं असावं. नाहीतर रुग्णांनी बाथरूम वापरण्याआधी घरातील इतर सदस्यांनी वापरून घ्यावं. हे बाथरूम sanitize करून घ्यावं.

रुग्णाची भांडी, टॉवेल, बेड तो वापरत असलेल्या वस्तू वेगळ्या असाव्यात इतरांनी त्या वापरू नये. त्या व्यक्तीने वापरलेल्या सर्व वस्तू sanitize करून घ्या.

रुग्ण आणि घरातील सर्व सदस्यांनी मास्क घालावेत आणि या सदस्यांनीही इतरांशी थेट संपर्क ठेवू नये. घरात क्वारंटाइन करून घ्यावं.

अन्य बातम्या

CoronaVirus फ्रिजमध्येही जिवंत राहू शकतो का?

COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2020 08:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading