जाहिरात
मराठी बातम्या / Viral / सरकारी अधिकाऱ्याला थेट चपलेने मारून विचारला जाब! TikTok स्टार भाजप महिला नेत्याचा प्रताप VIDEO

सरकारी अधिकाऱ्याला थेट चपलेने मारून विचारला जाब! TikTok स्टार भाजप महिला नेत्याचा प्रताप VIDEO

सरकारी अधिकाऱ्याला थेट चपलेने मारून विचारला जाब! TikTok स्टार भाजप महिला नेत्याचा प्रताप VIDEO

TikTok स्टार आणि भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या नेत्या सोनाली फोगट यांनी मार्केट कमिटीच्या एका कर्मचाऱ्याला थेट चपलेने मारहाण केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हिसार (हरियाणा), 5 जून : एका सरकार कर्मचाऱ्याशी वादविवाद करताना चक्क स्वतःची चप्पल काढून त्याला थप्पड मारणाऱ्या भाजपच्या महिला नेत्यांचा VIDEO व्हायरल झाला आहे. TikTok स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट यांनी मार्केट कमिटीच्या एका कर्मचाऱ्याला थेट चपलेने मारहाण केल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणजिसिंह सुरजेवाला यांनी Tweet करून खट्टर सरकारला सरकारी नोकरी करणं अपराध आहे का? असं विचारत याबाबत जाब विचारला आहे. सोनाली फोगाट हे नाव TikTok या सोशल माध्यमावर लोकप्रिय आहे. या टिकटॉक स्टाला भाजपने हेरलं आणि थेट लोकसभा निवडणुकीचं तिकीट दिलं. यांनी हरियाणाच्या आदमपूरमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात सोनाली फोगट हरल्या होत्या. धक्कादायक! शिकाऊ नर्सची काढली छेड, बीड रुग्णालयातील व्हिडिओ आला समोर एक शेड उभारण्यावरून सोनाली आणि मार्केट कमिटीचा कर्मचारी यांच्यात वाद झाला. त्यावर माझ्याशी असं बोलायची हिंमत कशी केलीस असं म्हणत सोनाली यांनी चपलेने या कर्मचाऱ्याला मारलं, असं या VIDEO मध्ये दिसतं.

जाहिरात

या कर्मचाऱ्यानं आपल्याशी बोलताना अपशब्द वापरले. घाणेरड्या शब्दांत अवहेलना केली, असा सोनाली फोगाट यांचा आरोप आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप लावले आहेत. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढचा तपास पोलीस करत आहेत. अन्य बातम्या दिल्लीत चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक चारपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह नोटांमुळे कोरोना पसरतो? धास्तावलेल्या दुकानदारांनी मोदी सरकारकडे केली ही मागणी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: tiktok
  • First Published :
जाहिरात
जाहिरात