कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL

कोरोनाची दहशत! संसर्ग टाळण्यासाठी असे कापले जातात केस; VIDEO VIRAL

चीनमध्ये लोक कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे.सलूनमध्ये केस कापताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी एक अजब उपाय करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 6 मार्च : जगभरात कोरोना व्हायरसची भीती दिवसेंदिवस वाढते आहे. एकीकडे त्याविषयी प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या व्हायरसची लागण होऊ नये याकरता लोक अनेक उपाय करताना दिसता आहेत. चीनमध्ये केस कापताना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये या करता अजब उपायाचा शोधण्यात आला आहे.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. आत्तापर्यंत चीनमध्ये 3000 लोकांचा मृत्यू झाला असून 80000पेक्षा जास्त लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चीनमध्ये लोक कोरोनामुळे इतके भयभीत झालेत की दैनंदिन काम करायला बाहेर जायचंही टाळत आहेत.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन नवीन क्लृप्त्या काढल्या जात आहेत. सलूनमध्ये लोकांचे केस चक्क 4 फूटांवरून कापले जात आहेत. याविषयीचा एक VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चीनमध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अनेक कामं सोप्या पद्धतीने केली जातात. आता तर कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली आहे. हे लोक चीनमधील हेनान भागातील सलूनमध्ये 3 ते 4 फूटावरून केस कापत आहेत. एका लांब काठीसारख्या वस्तूच्या साहाय्याने लोकांचे केस कापले जात असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. केस कापण्याच्या कात्रीसोबतचं दुसऱ्या काठीला हेयर ब्रश देखील लावण्यात आला आहे. यामुळे दोन्ही व्यक्तींचा संपर्क होत नाही.

चीनमध्ये हजारो लोक या आजारातून बरेही झालेत. COVID-19 ने ग्रस्त असेल्या 81 टक्के रुग्णांमध्ये याचा सौम्य असा परिणाम दिसून आला आहे. 18 फेब्रुवारीला China CDC weekly ने Chinese Center for Disease Control and Prevention चा हवाला देत दिलेल्या माहितीनुसार, फक्त 13.8 टक्के लोकांना कोरोनामुळे जास्त समस्या आहेत. तर 4.7 टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

WHO ने संक्रमण टाळण्यासाठी लोकांनी एकमेकांपासून दूर राहण्याच आवाहन केल आहे. नाक, तोंडवर मास्क लावावा, हाथ मिळवताना सॅनिटायझरचा वापर करावा अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.

अन्य बातम्या

तुम्हाला कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसली तर... काय करायचं, कुठे जायचं जाणून घ्या

सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर नाही ना? शंका असल्यास 'या' चाचण्या करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2020 04:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading