सर्दी, खोकला, ताप; मला कोरोनाव्हायरस तर झाला नाही ना? शंका असल्यास 'या' चाचण्या जरूर करा
कोरोनाव्हायरसची (Coronavirus) कोणतीही लक्षणं दिसल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधा, जेणेकरून तुमच्या आवश्यक त्या चाचण्या (test) केल्या जातील.
|
1/ 6
स्वॅब टेस्ट (Swab test) – यामध्ये नाक किंवा घशात एक पट्टी किंवा ब्रश टाकून लाळेचे नमुना घेतले जातात
2/ 6
नसल अॅस्पिरेट (Nasal aspirate ) – नाकात सलाइन सॉल्युशन टाकलं जातं आणि सेक्शन पद्धतीने नमुने घेतले जातात.
3/ 6
Tracheal aspirate - म्हणजे एक लहानशी ट्युब (ब्रॉन्कोस्पोप) तोंडाच्या माध्यमातून फुफ्फुसांपर्यंत टाकली जाते आणि नमुने घेतले जातात.
4/ 6
Sputum test – या पद्धतीत एका विशिष्ट भांड्यात तुमची थुंकी घेतली जाते आणि शिवाय हाताच्या नसेतून रक्ताचे नमुने घेतले जातात.
5/ 6
तज्ज्ञांच्या मते, घसा किंवा फुफ्फुसातून घेण्यात आलेले नमुन्यांचा रिझल्ट विश्वसनीय असतो.
6/ 6
कोरोनाव्हायरसच्या चाचणीसाठी जगभरात विशेष अशा प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. भारतात केंद्र सरकारने कोविड 19 (covid 19) च्या चाचणीसाठी 15 लॅब तयार केल्यात.