नवी दिल्ली, 26 मे: अनेकदा दारू प्यायल्यानंतर लोकांना शुद्ध राहत नाही. दारूच्या नशेत लोक असं काही कृत्य करतात की नंतर त्यांना आपण केल्याल्या कृत्याची लाज वाटते. ब्रिटेनमध्ये (Britain) एक महिला दारू प्यायल्यानंतर खूपच चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 24 वर्षांची शर्ना वॉकर (Sharna Walker) नशेच्या अवस्थेत बर्मिंघम (Birmingham) मधील एका नाइट क्लबमध्ये (Night Club) पोहोचली होती. मात्र तिची अवस्था पाहिल्यानंतर तेथील बाउन्सर ट्रिस्टन प्राइस (Bouncer Triston Price) यांनी तिला क्लबमध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र या महिलेने क्लबबाहेरच गोंधळ सुरू केला. वॉरचेस्टर (Worcester) येथे राहणारी शर्ना वॉकर (Sharna Walker Bouncer Case) नाइट क्लब (Night Club) मध्ये प्रवेश न मिळाल्याने हिंसक झाली. तिने बाहेर उभे असलेल्या बाऊन्सर प्राइससोबत धक्का-बुक्की केली, त्याला वर्णभेदी (Racist Comment) शब्द बापरले आणि क्लबमधून बाहेर जाण्यापूर्वी मागे वळून त्याला शिवीगाळ केला आणि थुंकली. जेव्हा वॉकरला तिची बॅग पाडली नाही, तेव्हा तिने प्राइसला बॅग आणण्यास सांगितलं.
Sharna Walker. Worcester.
— Stan Collymore (@StanCollymore) May 24, 2021
Racist. In custody as we speak.
Sacked from a job.
"Black cunt,"nigger". https://t.co/JGYOKRK4WV
या प्रकरणानंतर 26 वर्षांच्या प्राइसने सांगितलं की, या घटनेला त्याला धक्का बसला आहे. त्यांनी बर्मिंघम मेल (Birmingham Mail) सोबत बातचीतमध्ये सांगितलं की, मी या प्रकरणानंतर कोणत्याही प्रकारचा वाद उपस्थित करू इच्छित नाही. हे ही वाचा- स्वयंपाक बनवताना दिसली ऑक्सिजन सपोर्टवरील आई, PHOTO पाहून नेटकरीही थक्क यापूर्वीही माझ्यासोबत अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. एका व्यक्तीने तर कामावर असताना माझ्यावर चाकूने हल्ला केला होता. या व्हायरल व्हिडीओ (Viral Video) 3 लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. सर्वजण या महिलाच्या कृत्याचा निषेध करीत आहेत. या प्रकरणानंतर महिलेला अटक करण्यात आली होती, चौकशीनंतर तिला जामिनावर बाहेर सोडण्यात आले आहे.