• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम

VIDEO: कोंबड्यासोबत पंगा घेणं भोवलं; तरुणाची झाली भलतीच फजिती, अक्षरशः फुटला घाम

आपल्या सर्वांना माहित आहे की कोंबडा किती चपळ असतो. पण जर तो कोणाच्या मागे लागला तर समोरच्याला घाम फुटेपर्यंत सोडत नाही. कोंबड्याचा असाच एक व्हिडिओ (Cock Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली 04 सप्टेंबर : सोशल मीडियावर (Social Media) कधी काय मजेशीर पाहायला मिळेल हे कोणीही सांगू शकत नाही. कधी कधी असे व्हिडिओ पाहायला मिळतात जे तुमचा दिवसच चांगला बनवतात. तर, काही व्हिडिओ असे असतात जे पाहून सगळेच हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक अतिशय मजेशीर व्हिडिओ (Funny Video Viral) व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. VIDEO : स्टेजवरच नवरदेवासोबत भांडण करून उठून गेली नवरी, पाहा नेमकं काय झालं आपल्या सर्वांना माहित आहे की कोंबडा किती चपळ असतो. पण जर तो कोणाच्या मागे लागला तर समोरच्याला घाम फुटेपर्यंत सोडत नाही. कोंबड्याचा असाच एक व्हिडिओ (Cock Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका मुलाला धडा शिकवताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ क्लिपमध्ये एक मुलगा हातात काठी घेऊन घराच्या दाराजवळ उभ्या असलेल्या कोंबड्याला त्रास देताना दिसत आहे. पण पुढच्या क्षणी या तरुणासोबत जे काही घडलं त्याची त्यानं कल्पनाही केली नसेल.
  View this post on Instagram

  A post shared by hepgul5 (@hepgul5)

  काही वेळेनंतर या मुलाच्या त्रासामुळे वैतागल्यानं कोंबडाही एकदमच त्याच्या मागे लागतो. हे पाहून तरुणाला अचानक काहीच सुचत नाही. घाईघाईत तो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यातील झाडाला लटकतो. कोंबड्याचं हे रुप पाहून तरुण इतका घाबरतो की एकदाही मागे वळून न पाहता तो तिथून पळ काढतो. अरे! हे काय? पाण्यात उडी मारताच पूर्ण वेगळे झाले डोक्यावरचे केस; मजेशीर VIDEO हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर hepgul5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. या व्हिडिओला सहा हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. बहुतेकांच्या हा व्हिडिओ चांगलाच पसंतीस उतरला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळे हेच म्हणत आहे, की पंगा घ्या पण कोंबड्यासोबत कधीच नको.
  Published by:Kiran Pharate
  First published: