मुंबई, 16 जून : बऱ्याचवेळा बिबट्याला पाहून आपली शिकर होऊ नये या भीतीनं अनेक प्राणी पळ काढतात. मात्र शांत झोपलेल्या कुत्र्याच्या वाटेला बिबट्या आल्यावर त्याची अवस्था काय झाली हे सांगणारा एक दुर्मीळ व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिग्विजय सिंह यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. सर्वात जास्त शक्तीशाली कोण आहे? असा सवाल विचारत हा व्हिडीओ ट्वीट केला. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता रस्त्यात शांतपणे कुत्रा झोपला आहे. त्याच्या रस्त्यात बिबट्या आल्यानंतर त्यांच्यात लढाई सुरू झाली. कुत्राने जोरात भुंकायला सुरुवात केली. या बिबट्याला अखेर माघार घेत तिथून निघून जावं लागलं. बिबट्याला पळवून लावणाऱ्या या कुत्र्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे
Interesting video!
— Eternal Traveller 🇮🇳 (@TravelerEternal) June 15, 2020
Probably the dog derived strength from his best friends, the humans...
@DownloaderBot
दिग्विजय सिंह यांनी हा व्हिडीओ जुना असल्याचंही ट्वीटमध्ये म्हटलं आहे. राजस्थानमधील हा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दिग्विजय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर 4.4 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 215 लाईक्स आहेत. संपादन- क्रांती कानेटकर