Home /News /news /

VIDEO - हत्तीही पडला चहाच्या प्रेमात; खास रेस्टॉरंटमध्येच घेतो चुस्की

VIDEO - हत्तीही पडला चहाच्या प्रेमात; खास रेस्टॉरंटमध्येच घेतो चुस्की

चहा प्यायल्याशिवाय या हत्तीच्या दिवसाची सुरुवातच होत नाही.

    रतलाम, 15 जून : चहाप्रेमी माणसं तर तुम्ही पाहिलीत मात्र चहाप्रेमी हत्ती (tea lover elephant) कधी पाहिलात का? हो बरोबर वाचलंत तुम्ही 'चहाप्रेमी हत्ती'. हत्तीलाही चहा पिण्याची सवय आहे, यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. मात्र हे खरं आहे. असा एक हत्ती आहे, ज्याला चहा लागतोच लागतो. आपल्याप्रमाणे त्याच्या दिवसाची सुरुवातही चहा पिऊनच होते. चहा प्यायल्याशिवाय तो काहीच काम करत नाही. मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) रतलामधील (ratlam) हत्ती चहाचा दिवाना आहे. दररोज सकाळी त्याला चहा लागतो आणि बरं का त्याचा चहावालाही ठरलेला आहे. त्या चहावाल्याकडेच तो चहा पितो, त्याशिवाय पुढेच जात नाही. चहा पिणाऱ्या या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रतलामच्या डालू मोदी चौकात असं दृश्य दररोज दिसून येते. सकाळी आठ वाजले की हत्ती आपल्या ठरलेल्या चहाच्या दुकानात येतो. चहा मिळेपर्यंत तो तिथंच ठाण मांडून बसतो. जोपर्यंत चहा मिळत नाही तोपर्यंत तो पुढेच जात नाही. चहा प्यायल्यानंतर मात्र तरतरी आल्याप्रमाणे तो आपल्या पुढच्या कामाला लागतो. हे वाचा - VIDEO : शेतकऱ्यानं वानराच्या पिल्लाला दिलं जीवदान, जाळ्यातून अशी केली सुटका विशेष म्हणजे या हत्तीला या एकाच दुकानातील चहा लागतो. दुसऱ्या चहा विक्रेत्यांकडील चहा त्याला बिलकुल आवडत नाही. दुसरा चहावाला त्याला चहा पाजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा चहाचा वास घेऊन तो न पिताच पुढे जातो. त्याला या चहाचा स्वाद इतका आवडला आहे की या चहानेच तो आपल्या दिवसाची सुरुवात करतो. चहा विक्रेत्यालाही त्याची आता सवय झाली आहे. हत्ती येताच आपल्या हाताने तो चहा बनवतो आणि हत्तीला पाजतो. हे वाचा - बिबट्याला थंडी लागली, तर व्यक्तीने लहान बाळासारखं घेतलं चादरीत VIDEO VIRAL महावताने सांगितलं, चहा पिण्यासाठी ते या दुकानात थांबत असत. एकदा दुकानदाराने हत्तीलाही चहा पाजला आणि तेव्हापासून हत्तीलाही चहाचा चस्का लागला. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून तो सलग या दुकानात येऊन चहा पितो. संपादन - प्रिया लाड
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Tea, Tea addict

    पुढील बातम्या