नवी दिल्ली, 29 जुलै : इथं ढगफुटी झाली, तिथं ढगफुटी झाली. पावसाळ्यात ढगफुटीच्या बातम्या कानावर पडतात. पण ढग फुटतात म्हणजे नेमकं काय होतं, ही ढगफुटी होते तरी कशी? हे प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही. पण आता ढगफुटीचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटाच येईल. ढगफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ढग फुटल्यामुळे गारपीट आणि गडगडाटासह मुसळधार पाऊस होतो. जेव्हा उबदार हवेचे प्रवाह पावसाचे थेंब पडण्यापासून रोखतात आणि पाणी गोठते तेव्हा असे होते. जेव्हा उर्ध्व प्रवाह कमकुवत असतो तेव्हा अचानक मुसळधार पाऊस पडतो. यापूर्वी हिमाचलमध्ये पूर आला होता जो ढगफुटीमुळे आला होता. ढगफुटी झाल्यावर त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत. पण ढगफुटी कशी होते ते नाही. हे दाखवणारा हा व्हिडी आहे. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. निसर्गाचा चमत्कार! जमिनीवरून आकाशाकडे वाहू लागली नदी; पाहा अद्भुत VIDEO व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला सर्वकाही शांत आहे. अचानक काळे ढग येतात आणि त्यातून पाणी कोसळू लागतं. डोंगरावरून जसा धबधबा कोसळावा तसा आकाशातून हा धबधबा कोसळताना दिसते. जसेजसे ढग फिरतात म्हणजे ढगांची हालचाल होते, तसंतसं पाण्याचीही हालचाल होते. जिझथं ढग जातात तिथं हे पाणी जातं. जणू काही आकाशातून कुणी नळ सोडला आहे किंवा पाण्याचा पाईपच फुटला आहे, असं वाटतं. पाहता पाहता इतकं पाणी आकाशातून जमिनीवर येतं की पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. बाप रे बाप! इथं पडला ‘विजांचा पाऊस’; अद्भुत पण भयंकर असं दृश्य; Watch Video @ThebestFigen या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला हा व्हिडीओ आहे. हे दृश्य ऑस्ट्रियातील लेक मिलस्टॅट येथील आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. काहींनी याला सुंदर निसर्ग म्हटलं आहे, तर काहींनी भीतीदायक म्हटलं आहे. एका युझरने हे आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे कारण लोक क्वचितच ढगफुटीची प्रक्रिया पाहतात.
☁️ Avusturya'daki Millstatt gölü üzerinde patlayan yağmur bulutu. pic.twitter.com/tfHuqDXnx4
— Bilimle Kalın (@BilimleKalin) February 18, 2022
तुमची या व्हिडीवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.