जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बाप रे बाप! इथं पडला 'विजांचा पाऊस'; अद्भुत पण भयंकर असं दृश्य; Watch Video

बाप रे बाप! इथं पडला 'विजांचा पाऊस'; अद्भुत पण भयंकर असं दृश्य; Watch Video

फोटो - उगर किजिलर

फोटो - उगर किजिलर

तब्बल 50 मिनिटं एकाच वेळी एकाच ठिकाणी 100 विजा कोसळल्या आहेत.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

अंकारा, 21 जून :  सामान्यपणे पावसात विजा कोसळतात. पण कधी विजांचा पाऊस तुम्ही पाहिलं आहे का? हो पावसात वीज नव्हे तर विजांचाच पाऊस. एका ठिकाणी असा विजांचा पाऊस कोसळला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. विजाचं हे दुर्मिळ असं दृश्य आहे. कदाचित असं दृश्य तुम्ही आजवर कधीच पाहिलं नसेल. विजा कोसळल्याच्या बऱ्याच घटना तुम्हाला माहिती असतील, वीज कोसळताना तुम्हीही पाहिली असेल. पण विजांचं असं दृश्य तुम्ही आयुष्यात पाहिलं नसेल. एकाच वेळी तब्बल 100 विजा कोसळल्या आहेत. तब्बल 50 मिनिटं विजांच्या पावसाचा थरार सुरू होता. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. Interesting Facts : वीज कशी तयार होते, ती आपल्यासाठी धोकादायक का असते? तुम्हाला माहितीय? 16 जून 2023 ची ही घटना आहे. मध्यरात्री सलग 50 मिनिटं वीज कोसळत होती. तीन प्रकारच्या विजा कडाडत होत्या. एक आकाशात चमकून आकाशातच गायब होत होती. दुसरी आकाशातून जमिनीवर येत होती आणि तिसरी आकाशातून पाण्यात पडत होती. तुर्कीतल्या मुदान्या शहरातील ही घटना आहे. एस्ट्रोफोटोग्राफर उगर इकिजलरने हे अद्भुत दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्याने आपल्या घराच्या छतावर कॅमेरा लावला होता. टाइम लॅप्स मोड सेट करून तो तिथून गेला. कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं दृश्य पाहून त्यालाही धक्का बसला. बिनडोक्याचा डॉग पाहून सर्वांना धक्का! पण VIRAL PHOTO मागील सत्य काही औरच; तुम्ही सांगू शकाल का? 2022 सालच्या एका अभ्यासानुसार अशा पद्धतीची वीज तेव्हा कोसळते जेव्हा विजेला आकाश आणि जमिनीदरम्यान वेगवान कंडक्टिव्ह ऑक्सिन पार्टिकल्स मिळतात. जे विजेला खेचून खाली आणतात.

दरवर्षी संपूर्ण जगभरात 140 कोटी वेळा वीज कोसळते. म्हणजे दर दिवशी जवळपास 30 लाख वेळा. प्रत्येक विजेत 10 कोटी ते 100 कोटी वोल्टचं वोल्टेज असतं. इतक्या वोल्टेजच्या आसपासचं तापमान 10 हजार डिग्री सेल्सिअस ते 22 हजार डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतं. ढगांमध्ये वीज कशी तयार होते? खरं तर, जेव्हा थंड हवा आणि उबदार हवा एकत्र येते तेव्हा उबदार हवा वर येते आणि ढगांमध्ये गडगडाट निर्माण होतो. थंड हवेत बर्फाचे स्फटिक आणि उबदार हवेत पाण्याचे थेंब असतात. वादळादरम्यान, हे थेंब आणि स्फटिक एकमेकांवर आदळतात आणि हवेत तुटतात. या घर्षणामुळे ढगांमध्ये वीज निर्माण होते. खरं तर ढगांमध्येही बॅटरीप्रमाणे ‘प्लस’ आणि ‘मायनस’ असतात. जेव्हा खालील चार्ज पुरेसे मजबूत होते, तेव्हा ढगातून ऊर्जा सोडली जाते. तेव्हा आपल्याला वीज कडाडल्याचं दिसतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात