मॉस्को, 20 जुलै : आतापर्यंत तुम्ही आकाशातून पडणारा पाऊस पाहिला आहे पण कधी आकाशात वाहणारी नदी पाहिली आहे का? आकाशात वाहणाऱ्या नदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. निसर्गाचा हा चमत्कार जो पाहून सर्वजण थक्क झाले आहे. असं अद्भुत दृश्य तुम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळेल माहिती नाही. सामान्यपणे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट वरून खाली पडते. अगदी पाणीही. त्यामुळेच झरे, धबधबा, धरणाचं पाणीही वरून खाली कोसळताना दिसतं. नदीचं पाणी सरळ दिशेने पुढे वाहत जातं. पण जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी नदी म्हणताच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. 13 जुलै 2023 रोजी कॅमेऱ्यात कैद केलेलं हे दृश्य. ज्यात नदीच्या पृष्ठभागावरून पाणी आकाशाच्या दिशेने जाताना दिसतं आहे. पाणी सोन्यासारखं चमकतं आहे. जणून काही जमिनीवर आकाशात स्वर्गाच्या दिशेनेचे ही नदी वाहते आहे, असं वाटतं आहे. VIDEO : मोठे डोळे अंगावर छिद्र, समुद्रात आढळला रहस्यमयी मासा; दृश्य कॅमेऱ्यात कैद आता ही अशी नदी आहे कुठे आणि ती जमिनीकडून आकाशाकडे कशी वाहते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. Zlatti71 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट कऱण्यात आला आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार ही कामा नदी आहे, जी रशियाच्या पर्म प्रदेशात आहे. इंटरनेटवर हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत . आतापर्यंत लाखो युजर्सनी तो पाहिला आहे आणि हजारो लाईक्स आले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. हे सुंदर आहे पण काय आहे, असं विचारलं आहे. तर एकाने सुंदर पण भयानक असं म्हटलं आहे. PHOTOS : जगातील अनोखे प्राणी, जे आयुष्यभर झोपतच नाही जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी ही नदी म्हणजे वॉटरस्पॉऊट आहे. हा एक प्रकारचा चक्रीवादळ आहे. जो स्तंभासारखा हवेत फिरत वर येतो. सामान्यपणे तो समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होते. मुख्यतः उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात ते तयार होतात.
A little about nature and the difference of mentality. Kama River. Perm region. July 13, 2023. pic.twitter.com/AaWTHqrnCR
— Zlatti71 (@djuric_zlatko) July 17, 2023
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.