प्राणी हे माणसांएवढीच हुशार असतात असे म्हणतात. त्यात कोल्हा म्हणजे सर्वात चतुर. कोल्ह्याच्या धुर्तपणाच्या अनेक गोष्टी आपण लहानपणी वाचल्याही असतील. मात्र सध्या कोल्हा आणि वाघ यांचा एक व्हिडीओ टिकटॉकवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कोल्ह्यानं आपले प्राण वाचवण्यासाठी लढवलेल्या शक्कल पाहून तुम्हीही त्याचे कौतुक कराल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोल्ह्याने धूर्तपणा दाखवत शिकार करण्यापासून स्वत: ला वाचवले. व्हिडीओमध्ये हा कोल्हा जंगलात फिरत होता, सिंहाला पाहताच तो ताबडतोब खाली पडला आणि त्याने मरण्याचा अभिनय करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- तरुणींची छेड काढल्यावर आता लिपस्टिकमधून थेट चालणार गोळी, पाहा VIDEO वाचा- Video : टेक ऑफ करताना निखळलं विमानाचं चाक, मग लँडिंग कसं झालं?
@ashanayak77 hahahah #talent #gay #fouryoupage #tiktokindia_ ♬ original sound - armaanmalik_5f
वाचा- बस लुटण्यासाठी चढला आणि बंदुक पॅन्टमध्येच अडकली, सुटली ना गोळी! दरम्यान, कोल्हा खाली पडल्यानंतर सिंहाने शिकार मिळाल्याचे समजून त्याच्या दिशेने चाल केली. मात्र कोल्ह्यानं धुर्तपणा दाखवत न पळता निपचित पडल्याचा अभिनय केला. कोल्हा मेला आहे असे समजून काही वेळाने सिंह तेथून निघून गेला. वाचा- चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आली चिमुकली, श्वास रोखून पाहा VIDEO हा व्हिडिओ टिकटॉकवर रुतुपर्णा नायक यांनी शेअर केला आहे. ज्याला आतापर्यंत 4 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच, 600 हून अधिक लोकांनी कमेंट केल्या आहेत.

)







