नवी दिल्ली, 08 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि गंभीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण समोर आलेला हा व्हिडिओ खूपच भयानक आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी चार मजली इमारतीच्या खिडकीतून बाहेर आली आणि भिंतीवर चालू लागली. हा व्हिडिओ स्पेनच्या डेजे बेटाचा आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, खिडकीत कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही आहे. या चिमुकलीचा जराही तोल गेला असता तर तिचा जीव गमावला असता. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे एखादे पालक इतके निष्काळजी कसे असू शकतात. ही चिमुरडी खिडकीच्या बाहेर येते काय इमारतीवरून चालते काय पण याकडे कोणाचंही लक्ष नसतं. ते झाले असे की, मुलीच्या आईने तिला खोलीत सोडले आणि आंघोळीसाठी गेली. तेवढ्यात ती मुलगी खोलीच्या खिडकीतून बाहेर आली आणि खिडकीला जोडलेल्या भिंतीवर चालू लागली. या भिंतीच्या साहाय्याने ती बाल्कनीत जाण्याचा प्रयत्न करत होती पण जाऊ शकली नाही. जेव्हा तिला बाल्कनीत जाता आली नाही तेव्हा ती परत तिच्या खिडकीकडे गेली. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे.
सुदैवाने या सगळ्या प्रकारात मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु जर ती या इमारतीवरून खाली पडली असती, तर तिचा प्राण गमावला असता. लहान मुलांच्या पालकांनी नेहमी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जर मुल लहान असेल तर अशा प्रकारे त्याला एकटे सोडू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू त्याच्याकडे ठेवू नका.

)







