Home /News /viral /

बस लुटण्यासाठी चढला आणि बंदुक पॅन्टमध्येच अडकली, सुटली ना गोळी!

बस लुटण्यासाठी चढला आणि बंदुक पॅन्टमध्येच अडकली, सुटली ना गोळी!

काही वेळानंतर या तरुणाने आपल्या ट्राऊझरमध्ये लपवलेली बंदूक काढण्याचा प्रयत्न केला. बंदूक काढत असताना अचानक त्याच्याकडून बंदुकीचा चाप ओढला गेला.

      मॅक्सिको, 08 जानेवारी : बस लुटण्याचा प्रयत्न एका चोराच्या जीवावर बेतला आहे. बसमध्ये शिरल्यानंतर या चोराने ट्राऊझरमध्ये लपवलेली बंदूक काढण्याचा प्रयत्न केला असता अचानक बंदुकीतून गोळी सुटली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना मॅक्सिको येथील जलिस्कामध्ये घडली. metro.co.uk ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 27 डिसेंबर 2019 रोजी घडली. एक तरूण बसमध्ये चोरी करण्यासाठी शिरला. तो बऱ्याच वेळ दारावरच उभा होता. काही वेळानंतर या तरुणाने आपल्या ट्राऊझरमध्ये लपवलेली बंदूक काढण्याचा प्रयत्न केला. बंदूक काढत असताना अचानक त्याच्याकडून बंदुकीचा चाप ओढला गेला. त्यामुळे काही कळायच्या आता गोळी सुटली आणि जागेवर कोसळला. गोळी सुटल्यामुळे हा तरूण जखमी झाला. गोळी सुटल्याच्या आवाजामुळे बसमध्ये एकच गोंधळ उडाला. गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला आणि मोठ्या प्रमाणात रक्त सांडलं. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. काही जणांनी बसमधून बाहेर उड्या टाकल्या. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा तरूण स्पष्टपणे दिसून येतोय. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. परंतु, या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमी तरूणाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं याची माहितीही कळू शकली नाही. दरम्यान, अशी माहितीही समोर आली की, बसमधील एका प्रवाशासह हा जखमी तरूण पुढील स्थानकावर उतरला होता. चौथ्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर आली चिमुकली, श्वास रोखून पाहा VIDEO सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि गंभीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण समोर आलेला हा व्हिडिओ खूपच भयानक आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी चार मजली इमारतीच्या खिडकीतून बाहेर आली आणि भिंतीवर चालू लागली. हा व्हिडिओ स्पेनच्या डेजे बेटाचा आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओने धुमाकूळ घातली आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, खिडकीत कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नाही. या चिमुकलीचा जराही तोल गेला असता तर तिचा जीव गमावला असता. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे, एखादे पालक इतके निष्काळजी कसे असू शकतात. ही चिमुरडी खिडकीच्या बाहेर येते काय इमारतीवरून चालते काय पण याकडे कोणाचंही लक्ष नसतं. तर झाले असे की, मुलीच्या आईने तिला खोलीत सोडले आणि आंघोळीसाठी गेली. तेवढ्यात ती मुलगी खोलीच्या खिडकीतून बाहेर आली आणि खिडकीला जोडलेल्या भिंतीवर चालू लागली. या भिंतीच्या साहाय्याने ती बाल्कनीत जाण्याचा प्रयत्न करत होती पण जाऊ शकली नाही. जेव्हा तिला बाल्कनीत जाता आलं नाही तेव्हा ती परत तिच्या खिडकीकडे गेली. हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. सुदैवाने या सगळ्या प्रकारात मुलीला कोणतीही दुखापत झाली नाही, परंतु, जर ती या इमारतीवरून खाली पडली असती, तर तिचा प्राण गमावला असता. लहान मुलांच्या पालकांनी नेहमी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. जर मुल लहान असेल तर अशा प्रकारे त्याला एकटे सोडू नका किंवा कोणत्याही प्रकारच्या वस्तू त्याच्याकडे ठेवू नका.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Bullet, Man, Viral, Viral video.

    पुढील बातम्या