फक्त 150 रुपयांची किमया! एका रात्रीत तो झाला कोट्यधीश; घ्यावी लागली पोलीस सुरक्षा

फक्त 150 रुपयांची किमया! एका रात्रीत तो झाला कोट्यधीश; घ्यावी लागली पोलीस सुरक्षा

कामावर जात असताना त्याने 150 रुपयांत लॉटरीची तिकिटे खरेदी केली. त्यावर त्याला एक कोटी रुपयांची लॉटरी लागल्यानंतर अभिनंदन करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

  • Share this:

मालदा, 20 जानेवारी : घरची आर्थिक परिस्थिती बिकट, तुटपुंज्या कमाईच्या जोरावर उदरनिर्वाह करणं कठिण असलेल्या सिविक वॉलंटियरला एक कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. यामुळे एका रात्रीत फिरोज आलम करोडपती झाला. त्याने 150 रुपयांत लॉटरीचे तिकिट खरेदी केलं होतं. स्वप्नातही आपण कधी करोडपती होईल असं वाटलं नव्हतं अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.

हरिश्चंद्रपूर इथं फिरोज सिविक वॉलंटियर म्हणून काम करतो. लॉटरी लागल्यानंतर त्याची भेट घेण्यासाठी रांग लागली आहे. लोकांनी इतकी गर्दी केली की शेवटी त्याला पोलिसांकडून सुरक्षा मागण्याची वेळ आली आहे. रविवारी त्याला पोलिस ठाण्यात शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक आले. त्याने लोकांना मिठाई वाटून आनंद साजरा केला.

फिरोज म्हणाला की, कामावर जात असताना लॉटरीचे तिकिट खरेदी केलं होतं. जेव्हा मित्राने त्याला एक कोटींचं बक्षीस लागल्याचं सांगितलं तेव्हा विश्वास बसला नाही. वृत्तपत्रात लॉटरीचे नंबर जेव्हा जुळवून पाहिले तेव्हा खात्री झाली. त्यानंतर लोकांच्या गर्दीमुळे पोलिसांची सुरक्षा घ्यावी लागली.

वाचा : PF खातेधारकांसाठी मोठी बातमी, लाखो कर्मचाऱ्यांना लागणार झटका

लॉटरीतून मिळालेल्या पैशांचे काय करणार असा प्रश्न विचारताच फिरोजने सांगितलं की, वडिल आणि भाऊ सध्या हयात नाहीत. भावाच्या कुटुंबाची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच आहे. या पैशातून वडिलांच्या स्वप्नातलं घर उभा करणार आहे. भावाच्या मुलींचे शिक्षण, लग्नाचा खर्च करेन.

वाचा : वडिलाचे हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, 7 दिवसांनंतर FIR दाखल

First published: January 21, 2020, 7:56 AM IST

ताज्या बातम्या