रामपूर, 20 जानेवारी : उत्तर प्रदेशमधील रामपूर (Rampur) मध्ये 7 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली. अखेर 7 दिवसांनंतर 3 अज्ञात आरोपींच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 जानेवारी रोजी रात्री शहजादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली होती. सुरुवातील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. पण पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार विचारणा केली असता त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलीस दलाने अखेर गुन्हा दाखल केला. धक्कादायक म्हणजे, 7 दिवसानंतर पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे. पीडित मुलीच्या वडिलाचा पोलिसांवर आरोप रामपूर येथील शहजादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 13 जानेवारी रोजी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. आरोपींनी पीडितेच्या वडिलाचे हातपाय बांधून बंदुकीच्या धाकावर मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. 14 जानेवारीला सकाळी जेव्हा पीडित मुलगी आपल्या वडिलांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिली जेलमध्ये टाकण्याची धमकी पोलीस जेव्हा पीडित मुलीच्या वडिलासह घटनास्थळी पोहोचले आणि नातेवाईकांची 3 तास चौकशी केली त्यानंतर पोलिसांनी घटना घडलीच नसल्याचा दावा केला. त्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून घडलेली हकीकत सांगितली. यावेळी प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधीही हजर होते. पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, ‘आमचे हातपाय बांधून आरोपींनी आमच्या डोळ्यादेखत आमच्या मुलीवर अत्याचार केला. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलो आणि तक्रार दिली. पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. जबरदस्तीने आमच्याकडून तक्रार करायची नाही असं लिहून घेतलं. वीटभट्टी मालकासोबत आमचा कोणताही वाद नव्हता. आम्ही पोलिसांना मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी सांगितलं पण पोलिसांनी यात काही स्पष्ट झालं नाहीतर जेलमध्ये जावं लागले अशी धमकी दिली होती.’ अखेर 3 जणांविरोधात गुन्हा दाखल पोलिसांवर आरोप झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी अखेर पीडित मुलीच्या वडिलांच्या जबाबवरून 3 अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची तपासही सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधिक्षक अरूण कुमार सिंह यांनी सांगितलं की, पीडितेनं तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आम्ही घटनास्थळी पोहोचलो होतो. शहजादनगरमध्ये वीटभट्टीवर पीडित मुलीचे वडील मजूर म्हणून काम करतात आणि त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या तक्रारीनुसार 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले आहे. पोलिसांचा कुटुंबावरच आरोप दरम्यान, पीडितेच्या कुटुंबियांनी सुरुवातीला तक्रार देण्यास नकार दिला होता. आम्हाला जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असता पीडितेच्या कुटुंबीयांनी अशी घटना घडली नसल्याचं सांगितलं. तसं त्यांनी लिहूनही दिलं होतं. त्यामुळे गु्न्हा दाखल केला नाही. पण आता पीडितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली असता आम्ही तातडीने गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला, असंही पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.